तरुण भारत

अल्पवयीन मुलीवर 44 जणांकडून बलात्कार

तिरुअनंतपुरम  

44 जणांनी लैंगिक शोषण केल्याचा हादरवून टाकणारा खुलासा केरळमधील 17 वर्षीय मुलीने केला आहे. निर्भया केंद्रावर झालेल्या समुपदेनशादरम्यान या अल्पवयीन मुलीने स्वतःवरील अत्याचाराला वाचा फोडली आहे. लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या अनेकांना अद्याप अटक झालेली नाही. समुपदेशन सुरू असताना पीडितेने ही माहिती दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. केरळच्या मलप्पुरम जिल्हय़ाच्या पल्लकडमध्ये 17 वर्षीय मुलीवर बलात्कार तसेच छेड काढल्याच्या आरोपाप्रकरणी 44 जणांच्या विरोधात 32 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याप्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एनसीआरबीच्या एका अहवालानुसार 100 टक्के साक्षर असलेले केरळ 1 लाख लोकसंख्येमागे महिलांवरील बलात्काराप्रकरणी दुसऱया स्थानावर आहे.

Advertisements

Related Stories

‘कोव्हॅक्सिन’ राज्यांना 400 रुपयात

Amit Kulkarni

ओमर अब्दुल्लांना भाजपाने पाठविले रेजर

prashant_c

दिल्ली उपराज्यपालांचे अधिकार वाढणार

Patil_p

आंध्रमध्ये देवांच्या मूर्तीची विटंबना सुरूच

Patil_p

राजस्थानमध्ये एका दिवसात 118 नवे कोरोना रुग्ण; तर 3 जणांचा मृत्यू

Rohan_P

दिल्लीत मागील 24 तासात 24,331 नवे कोरोना बाधित; 348 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!