तरुण भारत

जानेवारी 15 पर्यंत साखरेचे उत्पादन 142 लाख टन

मागील वर्षांच्या तुलनेत उत्पादनात 31 टक्क्यांची वाढ ;  आयएसएमएची माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

व्यापारी वर्ष 2020-21 च्या पहिल्या साडेतीन महिन्यांमध्ये देशातील साखर उत्पादन मागील वर्षाच्या तुनलेत 31 टक्क्यांनी वाढले आहे. ऑक्टोबरपासून  व्यापारी वर्ष सुरु झाले आहे. म्हणजेच 15 जानेवारीपर्यंत 142.70 लाख टन साखर उत्पादन झाले आहे, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (आयएसएमए) यांच्याकडून देण्यात आली आहे.

आयएसएमएनुसार मागील व्यापारी वर्षात (2019-20) समान कालावधीत हे उत्पादन 108.94 टन राहिले होते. साखर उत्पादनाच्याबाबतीत भारत ब्राझीलनंतरचा दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. मागील वर्षातील समान कालावधीत जवळपास 440 साखर कारखाने कार्यरत होते.  व्यापारी वर्ष 2020-21 मध्ये हा आकडा वधारुन 487 वर पोहोचला आहे.

देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे.  महाराष्ट्र राज्याचे याच कालावधीदरम्यानचे उत्पादन 25.51 लाख टनानी वधारुन 51.55 लाख टन झाले आहे. देशातील तिसऱया क्रमांकावर साखर उत्पादक राज्य म्हणून कर्नाटक असून उत्पादन 15 जानेवारीपर्यंत वाढून 29.80 लाख टन झाले आहे, जे वर्षाच्या अगोदर समान कालावधीत 21.90 लाख टनाच्या घरात राहिले होते.

उत्तर प्रदेशात उत्पादनात घट

देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्य उत्तर प्रदेशातील साखर उत्पादन 15 जानेवारीपर्यंत 42.99 लाख टन राहिले आहे. गुजरातमध्ये 4.40 लाख टन आणि तामिळनाडूमध्ये 1.15 लाख टनापर्यंत उत्पादन पोहोचले आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि ओडिसा यांचे उत्पादन 12.81 लाख टन झाले आहे.

Related Stories

शुभा तातावर्ती विप्रोच्या सीटीओ

Patil_p

तेजीचा कल कायम

Omkar B

सॅमसंगचे नवे फ्रिज दाखल

Patil_p

एसबीआयच्या योनो शाखेचा तीन शहरात प्रारंभ

Patil_p

सुरुवातीची तेजी गमावत सेन्सेक्सची घसरण

Patil_p

हॉस्पिटॅलिटी क्षेत्र येतंय पूर्वपदावर

Patil_p
error: Content is protected !!