तरुण भारत

सांडपाण्यातून इंधन निर्मिणार पर्पल जिवाणू

स्पेनच्या वैज्ञानिकांचा दावा : वीजनिर्मितीही वापर शक्य

वैज्ञानिकांनी जीवाणूच्या मदतीने सांडपाण्यातून इंधनाची निर्मिती केली आहे. पर्पल बॅक्टेरियाला सूर्यकिरणांमधून ऊर्जा प्राप्त होते. याचा वापर करून हा जिवाणू सांडपाण्यातून हायड्रोजन इंधन वेगळे करतो. हा जिवाणू कुठल्याही जैविक कचऱयातून कार्बन प्राप्त करू शकतो. यादरम्यान निघालेल्या ऊर्जेचा वापर वीजनिर्मितीसाठी करता येणार असल्याचे स्पेनच्या वैज्ञानिकांनी स्वतःच्या संशोधनात म्हटले आहे.

Advertisements

इंधननिर्मितीचे स्वरुप

बॅक्टेरियावर संशोधन करणाऱया किंग जुआन कार्लोस विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनुसार पर्पल फोटोट्रॉफिक बॅक्टेरियाला इलेक्ट्रिक करंट दिल्यास ते कुठल्याही जैविक कचऱयातून 100 टक्क्यांपर्यंत कार्बन प्राप्त करतात. यादरम्यान हायड्राजन वायू बाहेर पडतो, ज्याचा वापर वीजनिर्मितीसाठी करण्यात आला आहे.

मेटबॉलिज्म वेगवान

वैज्ञानिकांनुसार घर आणि उद्योगांमधून बाहेर पडणाऱया सांडपाण्यात बायोप्लास्टिक, एनिमल प्रोटीन आणि अन्य गोष्टीही असतात. ते साफ करण्याची कुठलीच अचूक पद्धत नाही. पर्पल बॅक्टेरिया ही अस्वच्छता इंधनात रुपांतरित करण्याचे कौशल्य बाळगतो, कारण त्याचा मेटाबॉलिज्म गतिमान आहे. हा दुसऱया फोटोट्रॉपिक बॅक्टेरियापेक्षा उत्तम आहे.

पर्पल बॅक्टेरिया

हा ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया असून सूर्यकिरणांद्वारे फोटोसिंथिसिस प्रकियेच्या माध्यमातून स्वतःचे भोजन तयार करतो. यात बॅक्टीरियोक्लोरिफल ए आणि बी पिगमेंट आढळून येते. बॅक्टेरियाच्या जांभळय़ा रंगासाठी हा पिगमेंट कारणीभूत आहे.

Related Stories

‘हे’ तीन पत्रकार आहेत मागील दोन महिन्यांपासून गायब

prashant_c

अमेरिकेत 1 नोव्हेंबरपासून लस वितरण

Patil_p

अमेरिकेत स्थिती बिघडली

Patil_p

वुहानमध्ये होणार सर्वांचीच कोरोना टेस्ट

datta jadhav

इस्लामाबादमध्ये होणार हिंदू मंदीर, स्मशानमूमीलाही जागा

Patil_p

अरुणाचल प्रदेशात चीनने वसवलं गाव

datta jadhav
error: Content is protected !!