तरुण भारत

जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीतील जखमीचा मृत्यू

पुलाची शिरोली / वार्ताहर

येथील जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीतील जखमीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अशोक नवनाथ जानराव ( वय ५७, रा. माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, कोल्हापूर ) असे मृताचे नाव आहे. मुलगा अमोल अशोक जानराव याच्या फिर्यादीवरून शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष अभिमान जानराव, सुधाकर अभिमान जानराव, पद्मिनी अभिमान जानराव व सुनिता सुधाकर जानराव ( सर्व रा. माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, कोल्हापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Advertisements

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, जानराव कुटुंबियात घराच्या जागेतील वाद आहे. याच वादातून शनिवारी ( ता. १६ ) मारामारी झाली. संतोष, सुधाकर, पद्मिनी व सुनिता यांनी अमोल, अमोलचा भाऊ, आई व वडील अशोक यांना लाथाबुक्कयांनी मारहाण केली. यामध्ये अशोक जानराव यांच्या पोटावर तीव्र मार लागल्याने त्यांचा आतड्याला छिद्रे पडली. त्यांच्यावर तात्काळ कोल्हापूरातील सरकारी दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Related Stories

माण मध्ये एकाच दिवसी चार पॉजिटिव रुग्ण सापडल्याने खळबळ

Patil_p

कोल्हापूर : नागपूर – रत्नागिरी राष्ट्रीय मार्ग भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध

triratna

दिलासा…विक्रमी 1280 जणांना डिस्चार्ज

Patil_p

मंत्री राठोड यांचा राजीनामा ?

triratna

दहा हजारांची लाच घेताना मंडलाधिकारी जाळ्यात

Patil_p

कोते लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

triratna
error: Content is protected !!