तरुण भारत

3 विमानतळांची जबाबदारी अदानी समुहाकडे

50 वर्षांसाठी करार : जयपूर, गुवाहाटी, तिरुअनंतपुरमचा समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिलली

Advertisements

अदानी समुहाला देशातील तीन प्रमुख विमानतळांची जबाबदारी मिळाली आहे. अदानी पोर्ट आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) दरम्यान मंगळवारी करार झाला आहे. या कराराच्या अंतर्गत पुढील 50 वर्षांसाठी जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरमची जबाबदारी अदानी समुहाकडे असणार आहे.

संचालनासाठी विमानतळ प्राधिकरणासोबत झालेल्या कराराच्या अंतर्गत तीन विमानतळांची जबाबदारी मिळाली आहे. कराराच्या अंतर्गत जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमातळाचा टेकओव्हर पुढील 6 महिन्यांमध्ये होऊ शकतो. यात विमानतळाचे संचालन, व्यवस्थापन आणि विकासाची जबाबदारी आता अदानी समुहाकडे असणार आहे. अदानी समुहाचे अध्यक्ष गौत अदानी आहेत.

यापूर्वी फेब्रुवारी 2019 मध्ये 6 विमानतळांसाठी अदानी समूह सर्वात मोठा बोलीदार ठरला होता. यात लखनौ, मंगळूर, अहमदाबाद, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळ सामील होते. यात मंगळूर, लखनौ आणि अहमदाबाद विमानतळासंबंधी मंत्रिमंडळाने जुलैमध्येच मंजुरी दिली होती.

Related Stories

रेपो रेट जैसे थे!

datta jadhav

आता उत्तराखंडातही सर्वांना मिळणार मोफत लस

Rohan_P

4 कोटी डोस खरेदी, जिल्हय़ांमध्ये स्टोअर रुम

Patil_p

लसीसाठी आता ‘ऑन-साईट’ रजिस्ट्रेशन

Patil_p

विक्रमी 86,432 नवे रुग्ण

Patil_p

”विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करावी ही अपेक्षा असेल तर ते चालणार नाही”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!