तरुण भारत

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा वेळापत्रकात बदल नाही

वृत्तसंस्था/ मेलबर्न

येथे 8 फेब्रुवारीपासून 2021 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियात कोरोना बाधित रूग्ण नव्याने आढळत असल्याने या स्पर्धेवर चिंतेचे सावट निर्माण झाले आहे पण सदर स्पर्धेच्या वेळापत्रकात आणि रूपरेषेमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे ठामपणे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.

Advertisements

या स्पर्धेत खेळविल्या जाणाऱया पुरूष एकेरीच्या सामन्यात तीन सेटस्चा खेळ निश्चित केला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. या स्पर्धेत एकूण 72 टेनिसपटूंना आयसोलेशनच्या 14 दिवसांच्या कालावधीत हॉटेलमधील खोल्यांतून बाहेर जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. या नियमामुळे टेनिसपटूंना सराव करण्याची संधी मिळत नाही. काही टेनिसपटूंनी या संदर्भात स्पर्धा आयोजकांकडे तक्रार केली आहे पण कोणत्याही परिस्थितीत ही ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा ठरलेल्या वेळेत आणि रूपरेषेमध्ये घेतली जाईल, असे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.

Related Stories

जर्मनीतील डीटीएम रेसिंग मालिकेत भारताच्या अर्जुन मैनीचा समावेश

Patil_p

सागर राणाच्या हत्याकांडात सुशील कुमारसोबत सहभागी असलेल्या चार जणांना बेड्या

Abhijeet Shinde

संजित, निशांत, आकाश उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

झेक प्रजासत्ताकचा स्कॉटलंडला झटका

Patil_p

केनिन-स्वायटेक यांच्यात आज जेतेपदाची लढत

Patil_p

धवन सेनेचे लक्ष मालिका विजयावर

Patil_p
error: Content is protected !!