तरुण भारत

खेडमध्ये वाळू वाहतुकीचे चार डंपर ताब्यात

प्रतिनिधी/ खेड

तालुक्यात बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणारे चार डंपर ताब्यात घेण्यात आले आहेत. येथील पोलिसांनी ही धडक कारवाई केली. हे चारही डंपर गोळीबार मैदानात उभे करण्यात आले आहेत. अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू असल्याची कुणकुण लागताच पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचला. त्यानुसार चार डंपर वाळूची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चारही ट्रक वाळूसह जप्त करण्यात आले. लाखो रूपये किंमतीची वाळू डंपरमध्ये असल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत चौघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबतचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. पोलिसांच्या धडक कारवाईने बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणाऱया व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisements

Related Stories

पूररेषा मारल्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनी मागवल्या हरकती!

Patil_p

आज मतदान, प्रशासनाकडून सज्जता

NIKHIL_N

सह्यकुशीत रंगला साक्षात परमेश्वराचा विवाह सोहळा

Patil_p

दुचाकी-टॅम्पोच्या धडकेत 5 जण जखमी

Patil_p

नेतेमंडळींसाठी यापुढे खबरदारी खूप महत्वाची

NIKHIL_N

रत्नागिरी : दापोली पोलिसांनी उघड केले बंदूक विक्रीचे मोठे रॅकेट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!