तरुण भारत

मुतगे येथील नवनिर्वाचित सदस्यांतर्फे स्वखर्चाने विकासकामांना प्रारंभ

वार्ताहर / सांबरा

मुतगे येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुनील चौगुले यांनी निवडून येताच स्वखर्चाने विकासकामांना प्रारंभ केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisements

येथील जैन समाजाच्या स्मशानभूमीचे स्वखर्चाने जेसीबी लावून सपाटीकरण करवून घेतले. त्यानंतर नजीकच्या अंगणवाडी परिसरात कचऱयाचे साम्राज्य पसरले होते. त्याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून कचरा हटविला व त्याठिकाणी स्वखर्चातून कचराकुंड देखील बसविणार आहेत. केवळ ग्रा. पं. च्या निधीवर अवलंबून न राहता प्रत्येक सदस्याने स्वबळावर ही गावच्या विकासासाठी हातभार लावल्यास गावचा कायापालट नक्कीच होईल, असे सुनील चौगुले यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. यावेळी सुनील चौगुले यांचा जैन समाजातर्फे सुरेंद्र बस्तवाड यांनी पुष्पहार घालून सत्कार केला. याप्रसंगी महावीर बस्तवाड, बाहुबली बस्तवाड, अजित पुजारी, नेमू बस्तवाडसह चेतन चौगले, पुंडलिक चौगुले, किरण इंगळे, उदय इंगळे, राजू पाटील (निलजी), बसवंत रामजेर, भाऊ चुनार, आनंद इंगळे आदी उपस्थित होते.

Related Stories

दोनपेक्षा अधिक बाधित असल्यास घर सीलडाऊन

Amit Kulkarni

केएलईएस डॉ. शेषगिरी कॉलेजमध्ये राष्ट्रीय युवा दिन साजरा

Amit Kulkarni

गणेबैल येथील सर्प मित्राकडून सापाला जीवदान

Amit Kulkarni

नेहरुनगर इंदिरा कॅन्टीनजवळ अस्वच्छतेमुळे दुर्गंधी

Amit Kulkarni

शहापूर येथे पावसाचे पाणी दुकानात शिरून नुकसान

Amit Kulkarni

दोन खुनांचे गुढ उकलण्याचे आव्हान कायम

Patil_p
error: Content is protected !!