तरुण भारत

सातारा : नागठाणेत चोरट्यांचा धुमाकूळ


प्रतिनिधी / नागठाणे

काशीळ पाठोपाठच नागठाणे (ता.सातारा) येथेही अज्ञात चोरट्यांनी बुधवारी पहाटे चांगलाच धुमाकूळ घातला. नागठाणे- सासपडे रस्त्यालगत असलेल्या आपला बझारचे शटर उचकटून सुमारे ५४ हजार रुपयांची रोकड चोरट्यानी लांबवली. तर शेजारील गिफ्ट शॉपीचे शटर उचकटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. लागोपाठ दोन दिवस बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन मोठ्या गावांत झालेल्या या घटनांमुळे पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

Advertisements


याबाबत पोलीसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नागठाणे ते सासपडे रोडलगत वर्दळीच्या ठिकाणी आपला बझार व त्रिमूर्ती गिफ्ट शॉपी तसेच अन्य दुकाने आहेत. मंगळवारी रात्री या दोन्ही दुकानांचे कामगार दुकाने बंद करून गेले होते.


बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी प्रथम आपला बझार या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी कँश काउंटरमधील रोख ५४ हजार रुपयांची रोकड लांबवली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा शेजारील त्रिमूर्ती गिफ्ट शॉपीकडे वळवला. प्रथम त्यांनी पुढचे शटर उचकटले.मात्र या ठिकाणी शॉपीचे संपूर्ण डिस्प्ले काउंटर असल्याने त्यांना आत जाता आले नाही.त्यानंतर त्यांनी बोळातील या शॉपीचे दुसरे शटरही उचकटण्याचा प्रयत्न केला.मात्र तेथेही तसेच काउंटर असल्याने चोरटे तेथून निघून गेले.


सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या लोकांना ही घटना निदर्शनास आल्यावर त्यांनी याची कल्पना बोरगाव पोलीसांना दिली. सपोनि डॉ.सागर वाघ यांनी घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञाना पाचारण केले. सोमवारी पहाटे काशीळ येथील मुख्य बाजारपेठेतही अश्याच प्रकारे अज्ञात चोरट्यांनी दुकाने फोडली होती. तेथूनही त्यावेळी १९,६०० रुपयांची रोकड लांबवली होती.लगेचच नागठाणे येथील मुख्य रस्त्यावरील दुकाने फोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बोरगाव पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.या घटनेची फिर्याद आपला बझारचे मॅनेजर बाबासो जयसिंग पाटील ( रा.खानापूर,ता.वाळवा.जि. सांगली,सध्या रा.नागठाणे, ता.सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

Related Stories

सातारा : कास फुलोत्सव पर्यटकांसाठी खुला

Abhijeet Shinde

ओमिक्रॉन जिल्ह्याबाहेर ठेवण्यासाठी प्रशासन अलर्ट

datta jadhav

दारूच्या दुकानाबाहेर मद्यपींची रांगच रांग

Patil_p

सातारा तालुक्यातील 4 बाधितांचा मृत्यू

Patil_p

रणजित जाधव यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट

Patil_p

उरमोडी नदीपात्रात आढळला बेपत्ता महिलेचा मृतदेह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!