तरुण भारत

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पहिली प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले…

ऑनलाईन टीम / मुंबई : 


ग्रामपंचायती निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झालेला आहे. पक्षनिहाय आकडेवारी पाहता भाजपने सर्वाधिक जागा जिंकून राज्यात आपणच नंबर वनच स्थान पटकावले आहे. राष्ट्रवादीने दुसऱ्या क्रमांकाच्या तर शिवसेना आणि काँग्रेसने अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या जागा जिंकल्या आहेत. 

Advertisements


विशेष म्हणजे या निवडणुकीत मनसेनेही चांगलाच जोर मारत राज्यातील बऱ्यापैकी ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी टि्वट करत लवकरच तुम्हा सगळ्यांना भेटणार असल्याचे सांगितले आहे. 


ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत, त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगले करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे, त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या, असे सांगितले आहे.


दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने स्वतःचे अस्तित्व दाखवून दिले आहे. मनसेने अंबरनाथ तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत वर्चस्व मिळवत ग्रामपंचायतीत झोकात एण्ट्री केली. अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने दणदणीत विजय मिळवला. 

Related Stories

प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये

Abhijeet Shinde

जिल्हा बँकेत सत्ताधाऱ्यांवर विश्वास शिवसेनेलाही बळ

Abhijeet Shinde

‘मेड-इन-इंडिया’ टॅबलेटद्वारे होणार अर्थसंकल्पाचे सादरीकरण

datta jadhav

ट्रम्प यांच्या नावे व्हाईट हाऊसमध्ये विष पार्सल

datta jadhav

राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाला रोहित पवारांचे प्रत्युत्तर

Rohan_P

सोन्याचे दर घसरले; 2 दिवसात 5 हजार रुपयांची घट

datta jadhav
error: Content is protected !!