तरुण भारत

दापोलीतील शिरशिंगे येथे परराज्यातील कामगाराचा निर्घृण खून

प्रतिनिधी / दापोली

रायगड जिल्ह्यातील रोहा येथून दापोली तालुक्यातील शिरशिंगे येथे सेंट्रींगच्या कामाकरीता आलेल्या लुईस नामक कामगाराचा वय 30 डोक्याच्या मागे जोरदार प्रहार करून निर्घुण खून झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकाराने खळबळ उडाली असून पोलीस मारेकर्‍याचा तपास घेत आहेत.

लुईस हा मूळ ओरिसा राज्यातील रहिवाशी होता. तो सेंट्रींगच्या कामाकरिता रोहा येथे भाड्याची खोली घेऊन राहत होता. तेथे त्याची राजेश बोडरे -वय 50 यांच्याबरोबर ओळख झाली. या ओळखीतून राजेश बोडरे याने त्याला दापोली येथे काम करण्याबाबत सुचवले.यानंतर हे दोघे दापोलीतील शिरशिंगे गावातील पिंपळाचा माळ येथील एसआरसिटीमध्ये सेंट्रींगच्या कामाला 7 जानेवारी रोजी रुजू झाले.

राजेश आणि लुईस हे जर एकाच छताखाली कामाच्या ठिकाणी राहत होते. तर याचा खून झाल्यावर राजेशला आवाज कसा आला नाही ? याबाबत पोलिसांनी राजेशकडे सखोल चौकशी केली. त्याच्या जबाबात विसंगती आढळून आल्याने राजेश याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

Advertisements

Related Stories

रत्नागिरी : अखेर समुद्रकिनाऱ्यावरच्या जलक्रीडा प्रकारांना परवानगी

Abhijeet Shinde

‘गणपती बाप्पा मोरया..!’

NIKHIL_N

कोकण मार्गावर धावली ‘मोदी एक्सप्रेस’

Abhijeet Shinde

डॉ. चाकुरकरांविरोधात मनसे आक्रमक

NIKHIL_N

सिंधुदुर्गची पाणी पातळी समाधानकारक

NIKHIL_N

बेनापुरात लांडग्यांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!