तरुण भारत

जपानमध्ये हिमवादळाचा कहर 30 वाहनांची परस्परांना धडक

मियागी

 जपानमध्ये मागील अनेक आठवडय़ांपासून हिमवादळाने मोठे नुकसान घडवून आणले आहे. परंतु याचे सर्वात भयावह स्वरुप मंगळवारी दिसून आले. मियागी येथे एका महामार्गावर वादळामुळे दृश्यमानता खालावल्याने एकामागोमाग एक 130 हून अधिक वाहनांची परस्परांना धडक बसली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून सुमारे 17 जण जखमी झाले आहेत. टोहोकू द्रुतगती मार्गावर हिमवादळामुळे दृश्यमानता खूपच खालावली होती. याचमुळे खबरदारीदाखल कमाल वेग 50 किलोमीटर प्रतितास करण्यात आला होता. परंतु तरीही किमान 134 वाहने दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. सर्वप्रथम एक ट्रक कारला जाऊन धडकला आणि त्यानंतर वाहनांच्या धडकण्याचे सत्रच सुरू झाले. महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे किमान 200 जण अडकून पडले. घटनास्थळावरून ढिगारा हटविण्यासाठी 8 तासांचा कालावधी लागल आहे.

Advertisements

Related Stories

न्यूझीलंड : जेसिंडा आर्डर्न यांनी रचला इतिहास

Patil_p

इस्रायलच्या मोसादला यश, इराणचा हल्ला हाणून पाडला

Patil_p

इस्रायलमधील नेतान्याहू सरकार संकटात

Omkar B

नेपाळमधील राजकीय संकट चिघळले

Patil_p

रोजगाराचे संकट

Patil_p

अमेरिकेत महाविनाशाचे हत्यार सक्रीय

Patil_p
error: Content is protected !!