तरुण भारत

बँक ऑफ महाराष्ट्र नफ्यात

मुंबई

 सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने डिसेंबर 2020 ला संपलेल्या तिसऱया तिमाहित निव्वळ नफ्यात 14 टक्के इतकी वाढ दर्शविली आहे. चालू आर्थिक वर्षात तिसऱया तिमाहीत महाराष्ट्र बँकेने 154 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे. बँकेच्या डोक्यावरील कर्जाचा भार बऱयाच अंशी कमी झाला असल्याचे बँकेच्या सूत्रांकडून सांगण्यात येते. याचे रुपांतर नफा वाढण्यात झाल्याचे सांगितले जात आहे. मागच्या वर्षात समान कालावधीत बँकेने 135 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहित बँकेचे एकूण उत्पन्न वाढून 3 हजार 577 कोटी रुपयांवर पोहचले आहे.

Advertisements

Related Stories

हवाई कंपन्यांना हवेत 5 अब्ज डॉलर्स

Patil_p

योनो प्लॅटफॉर्मसाठी एसबीआयची वेगळी योजना

Omkar B

जिओची आता अमेरिकन सिल्वर लेक सोबत हात मिळवणी

Patil_p

जेबीएम ऑटोला मिळाली मोठी ऑर्डर

Patil_p

ओएनजीसीला कोलंबियात सापडले तेलसाठे

Omkar B

भारतीय पबजीकरीता पूर्वनोंदणी 18 मेपासून

Patil_p
error: Content is protected !!