तरुण भारत

भरधाव ट्रकची इर्टीगा कारला धडक

प्रतिनिधी/ रत्नागिरी

भरधाव वेगाने मालवाहतुकीचा ट्रक चालवून चारचाकी वाहनाला धडक दिल्याप्रकरणी मालवाहतूक करणाऱया चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े हा अपघात रविवार 17 रोजी सकाळी 8 च्या दरम्यान हातखंबा गावातील तीव्र वळणार झाल़ा

Advertisements

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ट्रकचालक संतोष लालसिंग जाधव (29, ऱा आहेरी लमाणी तांडा, ज़ि विजापूर) हा मालवाहक ट्रक  (केए-28-डी-0755) घेवून गोवा ते मुंबई असा घेवून जात होत़ा दरम्यान हातखंबा गावातील तीव्र उतारावर रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव ट्रक दादर ते गोवा अशा जाणाऱया इर्टीगा कारला (एमएच 01-डीई-3094) जोरदार धडक दिल़ी सुदैवाने इर्टीगा कारमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाह़ी या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय झगडे यांनी फिर्याद दाखल केली.

Related Stories

शाळांच्या इंग्रजी माध्यमांतरला मराठी भाषिक अभ्यासकांचा विरोधच

NIKHIL_N

प्रचंड मोर्चाने जागवली ‘उमेद’

NIKHIL_N

चिपळुणात सांस्कृतिक केंद्रावर वृक्ष कोसळला!

Patil_p

ज्येष्ठ दशावतारी कलाकार भास्कर सुतार यांचे निधन

Ganeshprasad Gogate

कामचुकार बीएलओंवर कारवाईची टांगती तलवार

Patil_p

रत्नागिरीत दोन मुलींचे फेसबुक अकाऊंट हॅक

Patil_p
error: Content is protected !!