तरुण भारत

पांगारे येथे बछडय़ासह बिबटय़ा मादीचे दर्शन

वार्ताहर/ परळी

पांगारे (ता. सातारा) येथे धरणालगत बछडय़ासह एका बिबटय़ा मादीचे दर्शन झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाने याची दखल घेऊन सापळा लावून बचडय़ासह मादीला सुरक्षितस्थळी त्यांच्या अधिवासात सोडावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. प्रत्यक्षदर्शी विष्णू पवार यांनी हे या बछडय़ांसह बिबटय़ा मादीला समोरुन जाताना पाहण्याचा थरार अनुभवला आहे. मात्र, छायाबध्द होवू शकला नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी, ठोसेघर पठार भाग विविध नैसर्गिक साधनसंपत्तीने नटला आहे. या परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे बिबटे, रानगवे, अस्वल, भेकर, ससा, रानडुक्कर या वन्य प्राण्यांचा मोठय़ा प्रमाणावर वावर असतो. परळी परिसरात काही दिवसांपुर्वी बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात एका शेळीचा मृत्यू झाला होता.

ही घटना ताजी असताना दोन दिवसांपूर्वी पांगारे येथील धरणालगत एका बछडय़ासह मादी बिबटय़ा पाणी पिऊन घनदाट जंगलात दिमाखात निघून गेल्याचे दृश्य प्रत्यक्षदर्शी पांगारे येथील विष्णू पवार यांनी पाहिले आहे. वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणून या मादीचा वावर असणाऱया परिसरात सापळा लावून बछडय़ासह मादीला सुरक्षितस्थळी त्यांच्या अधिवासात सोडण्यात यावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Related Stories

मोना स्कूल आता कारवाई टप्प्यात

Patil_p

प्राथमिक शिक्षिकेने केला आत्महत्येचा प्रयत्न

triratna

पुण्यात विजबिलांची थकबाकी 1 हजार कोटींवर

pradnya p

पोहायला गेलेल्या युवकाचा बंधाऱयात बुडून मृत्यू

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात आठ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर

triratna

गांजाचे कलेक्शन सांगोल्यापर्यत, दीड किलो गांजा जप्त,आणखी चार अटकेत

Shankar_P
error: Content is protected !!