तरुण भारत

तीन दहशतवाद्यांचा एलओसीवर खात्मा

श्रीनगर / वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीवर भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱया तीन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे. यावेळी झालेल्या चकमकीत चार जवानही जखमी झाले आहेत. या चकमकीच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणांनी घुसखोरीचा मोठा डाव उधळून लावला आहे.

Advertisements

एलओसीच्या अखनूर सेक्टरच्या खौर भागात मंगळवारी सायंकाळनंतर दहशतवादी आणि लष्करी जवानांमध्ये जोरदार चकमक झाली. दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा मार्ग सुकर होण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने या परिसरात जोरदार गोळीबार सुरू केला होता. पाकिस्तानच्या गोळीबारात लष्कराचे चार जवान जखमी झाले आहेत. यानंतर भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. याचबरोबर घुसखोरीचा डाव देखील अयशस्वी ठरवला.

Related Stories

देशात मागील 24 तासात विक्रमी कोरोना रुग्णवाढ

datta jadhav

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल शपथबद्ध

Patil_p

देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1 हजार 380 रुग्णांची भर 

prashant_c

दिल्लीतील सीआरपीएफच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा, मुख्यालय सील

Rohan_P

नॅशनल पार्कमधून हटणार राजीव गांधींचे नाव

Amit Kulkarni

विनामूल्य लसीबाबत राज्यांनी निर्णय घ्यावा!

Patil_p
error: Content is protected !!