तरुण भारत

एटीके बागान-चेन्नईन एफसी लढत आज फातोडर्य़ात रंगणार

मडगाव : आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आज फातोर्डा स्टेडियमवर एटीके मोहन बागानची लढत चेन्नईन एफसी संघाशी होईल. एटीके सध्या दुसऱया स्थानावर आहेत. त्यांचे 11 सामन्यांतून 6 विजय, 3 बरोबरी व 2 पराभवाने 21 गुण झाले आहेत. चेन्नईन एफसीचे 12 सामन्यांतून 3 विजय, 6 बरोबरी व 3 पराभवाने 15 गुण झाले आहेत.

एटीकेला मागील दोन सामन्यांत पाच गुण गमवावे लागले आहेत. मुंबई सिटीविरूद्ध पराभव आणि एफसी गोवाविरूद्ध बरोबरी अशा कामगिरीमुळे त्यांचे दुसरे स्थान थोडक्यात बचावले. हे निकाल प्रतिकूल असले तरी प्रशिक्षक आंतोनियो लोपेझ हबास यांनी संघावर अवास्तव दडपण आले नसल्याचे स्पष्ट केले. मागील दोन सामन्यांत आम्ही दोन प्रमुख प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध खेळलो. त्यांच्याकडे स्पर्धा जिंकण्याची क्षमता आहे. आम्ही गुणतक्त्यात वरच्या भागात आहोत, कदाचित आम्हाला कामगिरीत सुधारणा करावी लागेल. एटीके मोहन बागानकडून खेळणारा फिजीचा स्ट्रायकर रॉय कृष्णा याने पहिल्या सहा सामन्यांत पाच गोल केले. त्यानंतर गेल्या पाच सामन्यांत मात्र त्याला एकच गोल करता आला आहे. प्रत्येक सामन्यात तीन गुण कमावण्याची आमची कल्पना असते, त्यानंतर आम्ही बाद फेरीचा विचार करू शकतो, असे हबास म्हणाले.

Advertisements

Related Stories

सामाजिक, आर्थिक क्षेत्रात युवा नेतृत्वाची गरज

Patil_p

पॅकेजच्या आधारे गोव्याला आत्मनिर्भर बनविणार

Omkar B

मुरगावच्या महिला शक्तीचा आवाज दडपण्याचा नगरविकासमंत्र्यांचा प्रयत्न- संकल्प आमोणकर

Amit Kulkarni

मजूरांना मिळाले मान्सूनपूर्व साफसफाईचे काम

Omkar B

सुरक्षित अंतर ठेवूनच खरेदी-विक्री करा

Patil_p

डिचोली तालुक्मयाला पावसाने झोडपले

Omkar B
error: Content is protected !!