तरुण भारत

शोकाकुल वातावरणात गुरूनाथ केळेकर यांच्यावर अंत्यसंस्कार

प्रतिनिधी / मडगाव

गोव्यातील मार्ग अभियानचे संस्थापक तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व गांधी-नेहरूच्या विचारसरणीचे प्रणेत गुरूनाथ शिवाजी केळेकर यांच्यावर काल दुपारी मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे पूत्र डॉ. समीर केळेकर यांनी चितेला अग्नी दिला. आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत तरूण राहिलेल्या गुरूनाथ केळेकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्याचे असंख्य चाहते यावेळी उपस्थितीत होते.

Advertisements

काल बुधवारी सकाळी स्व. गुरूनाथ केळेकर यांचे पार्थिव गोमेकॉतून मडगावातील निवासस्थांनी आणले गेले. यावेळी त्यांच्या असंख्य चाहत्यांनी तसेच मान्यवरांनी अखेरच दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. त्यात मडगावचे आमदार तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर, माजी सभापती तोमाझिन कार्दोज, रवींद्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक, माजी आमदार निर्मला सावंत, माजी आमदार ऍड. राधाराव ग्रासियश, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक नागेश करमली, उद्योजक दत्ता दामोदर नायक, शिक्षण तज्ञ प्रो. नारायण देसाई, कोकणी अकादमीचे अध्यक्ष अरूण साखरदांडे, कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ, भाषा मंडळाचे माजी अध्यक्ष चेतन आचार्य, मार्ग अभियानचे अध्यक्ष प्रशांत नाईक, उपाध्यक्ष आवदा व्हियेगस, सचिव अनंत अग्नी, ज्येष्ठ साहित्यिक पुंडलिक नायक, एन. शिवदास, दिलीप बोरकर, रजनी भेंब्रे, नुतन साखरदांडे, प्रशांती तळपणकर, ज्येष्ठ नाटय़कर्मी श्रीधर कामत बांबोळकर, पत्रकार संदेश प्रभुदेसाई, राजू नायक, नगरसेवक दामोदर नाईक, रूपेश महात्मे,  दामोदर शिरोडकर, अविनाश शिरोडकर, फा. मावझिनो आतायद, मार्टिन मिनीन फर्नांडिस, बेळगाव मार्गचे प्रतिनिधी शेखर पाटील आणि कृष्णा सिंग्नापूरकर, वाहतूक पोलीस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर, फोंडय़ातील डॉ. देव, सौ. सविता रमेश तवडकर, कमलाकर म्हाळशी, प्रा. हरिश्चंद्र नागवेकर, ऍड.  इत्यादीचा समावेश होता.

सकाळी 11.35च्या दरम्यान गुरूनाथ केळेकर यांच्या अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. मडगाव शहरातून अंत्ययात्रा लोहिया मैदानावर गेली. त्या ठिकाणी गुरूनाथ केळेकर यांचे पूत्र डॉ. समीर केळेकर यांनी डॉ. राम मनोहर लोहियाच्या पुतळय़ाला तसेच फ्रान्सिस लुईस गोम्स यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून नमन केले. मडगावच्या लोहिया मैदानावरच स्वातंत्र्य सैनिकांचे कार्यालय होते व त्याच ठिकाणी गुरूनाथबाब केळेकर आपल्या सहकारी स्वातंत्र्य सैनिकासोबत बैठका घ्यायचे, चर्चा व्हायची. लोहिया मैदानाचे सौंदर्यीकरण व्हावे यासाठी ते नेहमीच अग्रेसर असायचे व त्याच्याच प्रयत्नातून लोहिया मैदानाचे काही प्रमाणात सौंदर्यीकरण देखील झाले होते.

लोहिया मैदानावरून नंतर अंतयात्रा पाजीफोंड येथील स्मशानभूमीत गेली व तेथे त्यांच्यावर दुपारी 12.30च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कन्या डॉ. चित्रा जुवारकर तसेच डॉ. संजीवनी केणी यांची उपस्थिती होती.

आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही गुरूनाथबाब केळेकर यांनी गोव्यासाठी आपल्यापरीने योगदान दिले. त्यासाठी केवळ गोव्यातच नव्हे तर गोव्याबाहेर देखील ते फिरत होते. स्वातंत्र्य लढय़ात त्याचे योगदान किती महत्वाचे होते याची कल्पाना सर्वांनाच आहे. गोवा स्वातंत्र्य झाल्यानंतर ते गप्प बसले नाही. गांधी-नेहरूचे विचार त्यांनी संपूर्ण गोव्यात पोचविण्याचे कार्य केले. त्यानंतर त्यांनी मार्गाची चळवळ उभी केली. गोव्यात शुन्य अपघात व्हावे यासाठी ते तळमळीने काम करीत होते असे उद्गार दिगंबर कामत यांनी काल त्यांना श्रद्धांजली वाहताना काढले.

गुरूनाथ केळेकर यांचे गोव्याच्या स्वातंत्र्य लढय़ात खुप मोठे योगदान होते. ते एक उत्कृष्ट साहित्यिक गांधीवादी विचारवंत तसेच तत्वाशी जोडलेले व्यक्ती महत्व होते तसेच गोव्याच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते. त्याच बरोबर ते युवकांना प्रेरणा देण्याचे काम करीत होते असे उद्गार अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर यांनी काढले.

Related Stories

राज्यात मान्सून आगमन, शेती सुरु

Patil_p

फुटबॉलच्या विकासासाठी क्लबांनी अकादमींची निर्मिती करावीः प्रसून बॅनर्जी

Amit Kulkarni

राज्य नागरी सेवेतील सहा अधिकाऱयांच्या बदल्या

Amit Kulkarni

गरीबांसाठी फोंडय़ात ‘फूड बँक’ सुरु

Patil_p

सोमवारी कोरोनाचा एक बळी, 112 नवे बाधित

Patil_p

नितीन गडकरी यांची शनिवारी ऑनलाईन सभा

Omkar B
error: Content is protected !!