तरुण भारत

आमदार मुनिरत्न यांना न्यायालयाचा दिलासा

बेंगळूर : बोगस मतदार ओळखपत्र प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात  असलेल्या आमदार मुनिरत्न यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बेंगळूरच्या राजराजेश्वरीनगर विधानसभा मतदारसंघात 2018 मधील निवडणुकीवेळी जालहळ्ळी येथील एका अपार्टमेंटमध्ये बोगस मतदार ओळखपत्रे आणि मुनिरत्न यांच्या प्रचाराची पत्रके आढळून आली होती. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरणी सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी करून संतोषकुमार आणि आनंदकुमार यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. बुधवारी सदर याचिकेवरील सुनावणीवेळी मुख्य न्यायाधीश अभय ओक यांच्या विभागीय खंडपीठाने हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपविण्यास नकार दिला.

Related Stories

कारवाई झालेल्या परिवहन कर्मचाऱयांना दिलासा

Amit Kulkarni

म्हैसूरमध्ये शिक्षकांसाठी लसीकरण मोहीम

Abhijeet Shinde

कर्नाटकात सोमवारी पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत घट

Abhijeet Shinde

सिटी स्कॅन, एक्स-रे साठी सरकारकडून दर निश्चित

Amit Kulkarni

कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृतांच्या संख्येत वाढ

Abhijeet Shinde

जीएसटीच्या भरपाईपोटी मिळाले 8,542 कोटी रुपये

Amit Kulkarni
error: Content is protected !!