तरुण भारत

मेक्सिको : 20, 548 नवे कोरोना रुग्ण; 1,539 मृत्यू

ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी : 


मेक्सिकोमध्ये बुधवारी 20 हजार 548 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 1 हजार 539 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात आतापर्यंत 16 लाख 88 हजार 944 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 44 हजार 371 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 


मेक्सिकोत 16.88 लाख रुग्णांपैकी 12 लाख 64 हजार 780 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2 लाख 79 हजार 793 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 5,652 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 


कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिक जगात बाराव्या क्रमांकावर आहे. तर कोरोनाबळींच्या संख्येत या देशाचा चौथा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 42 लाख 44 हजार 955 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

Related Stories

रशियात 24 तासात कोरोनाचे 4 हजार नवे रुग्ण

prashant_c

संशयित दहशतवाद्याच्या नागरिकत्वावरून वाद

Patil_p

फ्रान्समध्ये कोरोना चाचणी होणार मोफत

datta jadhav

पेरू देशात आहे कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर

datta jadhav

अंतराळात पदार्थाच्या पाचव्या अवस्थेचे पुरावे

Patil_p

ट्रम्पपुत्रालाही लागण

Patil_p
error: Content is protected !!