तरुण भारत

मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांचा शुक्रवारी पाहणी दौरा

कोल्हापूर, जयसिंगपूर, मिरज, सांगली आणि सातारा स्थानकांना देणार भेटी

प्रतिनिधी / मिरज

Advertisements

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल हे आज शुक्रवारी मिरज जंक्शनसह कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली आणि सातारा रेल्वे स्थानकांच्या पाहणी दौऱ्यासाठी येत आहेत. सकाळी 11 वाजून 35 मिनीटांनी त्यांची जीएम स्पेशल रेल्वे मिरज जंक्शनवर दाखल होईल. मित्तल हे रेल्वे जंक्शनवरील विविध विभागांची पाहणी करुन अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करतील. कोरोनानंतर पहिल्यांदाच रेल्वे महाव्यवस्थापकांचा हा दौरा होत असल्याने त्यांच्या निरीक्षण भेटीला महत्त्व आले आहे.

महाव्यवस्थापक मित्तल हे सकाळी साडेआठ ते दहा वाजून 20 मिनिटांपर्यंत कोल्हापूर स्थानकाला भेट देतील. त्यानंतर दहा वाजून 50 मिनिटे ते 11 वाजेपर्यंत जयसिंगपूर स्थानकावर पाहणी करतील. त्यानंतर जीएम स्पेशल ट्रेनने ते मिरज जंक्शनवर सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी दाखल होतील. येथे ते सुमारे एक तास म्हणजे 12 वाजून 35 मिनिटांपर्यंत मिरज जंक्शनवरील विविध विभागांना भेटी देऊन स्थानिक प्रतिनिधी आणि रेल्वे प्रवासी संघटनांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारतील. त्यानंतर रेल्वे स्टेशन प्रबंधक आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी त्यांची जीएम स्पेशल ट्रेन सांगली स्थानकाकडे रवाना होईल. तेथे पाहणी झाल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता सातारा स्थानकावर पाहणी करतील.

Related Stories

वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनची भीती

Abhijeet Shinde

नागठाणे विद्यालयात चोरी

datta jadhav

बेरोजगारांना सुवर्णसंधी ; ऑनलाईन रोजगार मेळावा

Abhijeet Shinde

सांगली : बेडग येथे दीड कोटींचे गुटखा साहित्य जप्त

Abhijeet Shinde

ऑनलाईन लेक्चर चा पाच हजार विद्यार्थी घेतायत लाभ

Abhijeet Shinde

मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत आज जोतिबाची चैत्र यात्रा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!