तरुण भारत

अनोख्या बांबू पेनची यशस्वी निर्मिती

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे यश

प्रतिनिधी / मालवण :

Advertisements

पर्यावरणपूरक वस्तू बनविण्यासाठी नेहमीच योगदान देणाऱया येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रा. हसन खान यांनी कॉलेज विद्यार्थी भूषण कांबळी आणि नवनीत मेस्त्राr यांच्या साथीने वाया गेलेल्या बांबूच्या तुकडय़ांपासून काही पर्यावरणपूरक बनवावे, या उद्देशाने वेगळ्य़ा बांबू पेनची निर्मिती केली आहे. दोन वर्षांपासून केलेल्या या प्रयत्नाला आता यश मिळत असून परिपूर्ण बांबू पेनची निर्मिती यशस्वी झाली आहे. त्यामुळे अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या हाताला रोजगार आणि पर्यावरणपूरक वस्तू निर्मितीचा आनंद मिळत आहे.

येथील स. का. पाटील महाविद्यालयातील प्रा. खान हे नेहमीच नवनवीन उपक्रमांची निर्मिती करून कॉलेजमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन दालन खुले होत आहे.

प्लास्टिक पेनचा कचरा महत्वाचा

प्रा. खान म्हणाले, कचऱयाचा जेव्हा विचार करतो, तेव्हा प्लास्टिक बॉटल किंवा पिशव्या याच आपल्या डोळ्य़ासमोर येतात. परंतु बॉल पेनमुळे होत असलेला कचरा हा आपल्या नजरेआड आहे. या प्लास्टिक राक्षसाला तर आपण बाजूलाच ठेवले आहे. बॉल पेन हे पिशव्या व बॉटल यांचा पुनर्वापर करून तयार केले जातात. त्यांना रिसायकल करता येऊ शकत नाही कारण ते लास्ट वेस्ट आहे.

सातत्याने प्रयत्न केल्यानंतर यश

प्रा. खान म्हणाले, आज दोन वर्षे उलटली बांबू पेन तयार करून. मी सातत्याने वापर करून काय चुका होताहेत, याची सातत्याने पडताळली केली. नवीन बदल करत गेलो. बांबूची पेन पण रिफिल बदलण्याची व्यवस्था नसणारी, जी आहेत, त्यात पूर्ण बांबूचा वापर नाही. कुठचा तरी भाग हा प्लास्टिकचा आहे किंवा पेन मार्कर एवढी जाडजूड आहेत. त्यामुळे बहुदा जगातील हे या प्रकारचे पहिले बांबू पेन असेल, असा आमचा अंदाज आहे. दोन वर्षांपासून मी एकच बांबू पेन सातत्याने वापरत आहे. आजही दोन वर्षांपूर्वीच्याच सुस्थितीत व सुंदर रुपात पेन आहेत. महाविद्यालयातील भूषण कांबळीला माझ्या परीने मी शिकविले आहे. ‘हुनर की पाठशाला’मध्ये अजून एकाचे स्वागत. आज आम्ही दोघांनी तयार केलेली बांबू पेनं समाजासमोर येणार आहेत.

 बांबू पेनची वैशिष्टय़े

पूर्णपणे बांबूचा वापर, रिफिल बदलण्याची व्यवस्था, रेग्युलर पेन एवढी जाडी,  हलके व टिकावू, पर्यावरण पूरक, इको पॅकिंग, प्लास्टिक पेनला पर्याय, हॅण्ड क्राफ्टेड.

Related Stories

खेड नगर परिषद डिझेल घोटाळा, फौजदारी गुन्हा दाखल होणार!

Patil_p

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विलवडेतील ३० कुटुंबांना मदतीचा हात

Ganeshprasad Gogate

अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ‘वेटिंग’वर

NIKHIL_N

रत्नागिरी : ५ तालुक्यात आज एक दिवसाचा लॉकडाऊन

Patil_p

सभापती रउफ हजवानी यांचा उद्या होणार फैसला

Abhijeet Shinde

‘उमेद’ चे कंत्राटी अधिकारी, कर्मचारी शासनाकडून ‘बेदखल’

Patil_p
error: Content is protected !!