तरुण भारत

सांगली : विनयभंगप्रकरणी आरोपीला एक वर्षाची कैद

सहा वर्षानंतर निकाल, अडीच हजारांचा दंड

प्रतिनिधी / मिरज

Advertisements

सहा वर्षांपूर्वी महिलेच्या विनयभंग प्रकरणी अशोक हणमंत म्हैसाळे (वय 32, रा. गंगानगर, आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागे, हरिपूर ) या आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एक वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच अडीच हजार रुपयांचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास आणखी एक महिन्यांसाठी साधी कैदही होणार आहे. पिडीत महिलेकडून कोर्टात बाजू मांडणाऱ्या सरकारी वकील श्रीमती आसावरी जोशी यांनी काम पाहिले.

दरम्यान विनयभंगाची ही घटना सहा वर्षांपूर्वी घडली होती. मात्र, त्याचा निकान सोमवारी 18 जानेवारी 2021 मध्ये लागला. अखेर सहा वर्षानंतर का होईना आरोपीला शिक्षा मिळाली आणि पिडीत महिलेला न्याय मिळाला. त्यामुळे सरकारी वकिल म्हणून काम पाहिलेल्या श्रीमती आसावरी जोशी यांचे अभिनंदन होत आहे.

Related Stories

सांगली : वाळवा तालुक्यातील सरपंच आरक्षणात खुशी-गमची अनुभूती

Abhijeet Shinde

सांगली : मनपा वीज बिल घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा

Abhijeet Shinde

गांधीनगर मुख्य रस्त्यावरील डायट डिलाईट कॅफे अँड रेस्टो हॉटेलवर छापा

Abhijeet Shinde

बागणी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयास आय.एस.ओ. मानांकन जाहीर

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेत परिचारिकेची विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या

Abhijeet Shinde

निगडीची महिला कोरोनामुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!