तरुण भारत

इंग्लंड संघात स्टोक्स, आर्चरचे पुनरागमन

लंडन ; भारत दौऱयातील पहिल्या दोन कसोटीसाठी इंग्लंडने 16 सदस्यीय संघाची गुरुवारी घोषणा केली असून अष्टपैलू बेन स्टोक्स व वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांचे त्यात पुनरागमन झाले आहे. या मालिकेत एकूण 4 कसोटी होणार आहेत. इंग्लंडच्या निवड समितीने याशिवाय सहा राखीव खेळाडूंचीही निवड केली आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 5 फेब्रुवारीपासून चेन्नईत सुरू होणार आहे. त्यानंतर दुसरी कसोटीही चेन्नईतच होणार आहे.

इंग्लंडची सध्या लंकेविरुद्ध मालिका सुरू असून या मालिकेसाठी स्टोक्स व आर्चर यांना विश्रांती देण्यात आली होती तर रॉरी बर्न्सने पितृत्वाची रजा घेतल्याने तो मायदेशात राहिला होता. सरेचा ओली पोपही भारतात जाणार आहे आणि फिटनेस चाचणीत पास झाल्यानंतर त्याला संघात सामील केले जाणार आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेवेळी पोपच्या खांद्याला दुखापत झाली होती, त्यातून तो अद्याप सावरलेला नाही. या निवड समितीने जोनाथन बेअरस्टो, सॅम करन, मार्क वुड यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हे तीनही खेळाडू लंका दौऱयात खेळत आहेत.

Advertisements

‘तीनही फॉरमॅटमध्ये खेळणारे जे खेळाडू आहेत, त्यांना विश्रांती देण्याचे आमचे धोरण आहे. त्यानुसार आम्ही या खेळाडूंना वगळले आहे,’ असे ईसीबीने सांगितले.  आर्चर व स्टोक्स संघात परतल्यामुळे तसेच संघातील उर्वरित खेळाडू फिटनेस चाचणीत पास झाले तर सॉमरसेटच्या क्रेग ओव्हरटनला लंकेहून थेट मायदेशी परतावे लागणार आहे.

दोन कसोटीसाठी निवडलेला इंग्लंड संघ : जो रूट (कर्णधार), आर्चर, मोईन अली, जेम्स अँडरसन, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॉली, बेन्स फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, बेन स्टोक्स, ओली स्टोन, ख्रिस वोक्स.

Related Stories

यजुवेंद्र चहल, गौतम कोरोनाबाधित

Patil_p

बंगालच्या मनिंदरची चमक तरीही बेंगळूर बुल्स विजयी

Patil_p

मियामी स्पर्धेतून सेरेनाची माघार

Patil_p

क्रिकेट प्रशिक्षक आर.श्रीधर यांची चार लाखांची मदत

Patil_p

महिला एएफसी आशियाई चषक भारतात

Patil_p

दिनेश कार्तिकऐवजी मॉर्गनकडे नेतृत्व सोपवा!

Patil_p
error: Content is protected !!