तरुण भारत

कर्नाटक : राज्यात ६७४ नवीन बाधितांची नोंद

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात गुरुवारी ६७४ नवीन कोविड -१९ रुग्णांची भर पडली. तसेच ८१५ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९,३४,२५२ वर पोहोचली आहे. यापैकी ९,१४,४९२ रुगांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ७,५५४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृतांची संख्या १२,१८७ वर पोहचली आहे.

राज्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. गुरुवारी जिल्ह्यात ३७१ नवीन संक्रमित रुग्णांची भर पडली. तर एकाचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत एकूण १,६३,०६६०८ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी ८८,८५५ नमुन्यांची चाचणी गुरुवारी करण्यात अली आहे.

Advertisements

Related Stories

सिद्धरामय्या यांनी घेतला कोविड लसीचा दुसरा डोस

Abhijeet Shinde

चन्नम्मा विद्यापीठ इमारतीसाठी 110 कोटी

Amit Kulkarni

कर्नाटक : परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा पाचव्या दिवशी संप सुरूच

Abhijeet Shinde

भाजप मंत्री पोहोचले चक्क जीवंत जवानाच्या घरी श्रद्धांजली वाहण्यासाठी

Abhijeet Shinde

कर्नाटक सरकार विरोधात शिवसेनेचा एल्गार

Sumit Tambekar

लॉकडाऊन करण्याचा विचार नाही!

Amit Kulkarni
error: Content is protected !!