तरुण भारत

महामार्गावर बंदोबस्त,वाहनांची तपासणी

अनेकांना प्रवेश नाकारला : प्रवाशांची गैरसोय

वार्ताहर / कोगनोळी

Advertisements

बेळगाव येथे मराठी भाषिकांच्यावतीने काढण्यात येणाऱया मोर्चाला स्थगिती दिली आहे. सदर मोर्चाला पोलिसांच्याकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी येथील दूधगंगा नदीवर व फाटय़ावर पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱया सर्व चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

कोल्हापूर येथील शिवसेनेचे नेते व जिल्हाप्रमुख विजय देवणे हे बेळगावला जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी टोलनाक्मयावर कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याठिकाणी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱया सर्व चारचाकी वाहनधारकांना ओळखपत्र दाखवूनच प्रवेश देण्यात येत होता. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱया गाडीवर शिवसेना मजकूर असलेल्या गाडय़ांना देखील या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला. महाराष्ट्रातून कर्नाटकात इतर कामासाठी जाणाऱया नागरिकांना याठिकाणी अडवून महाराष्ट्रात परत पाठविण्यात आल्याने अनेकांची गैरसोय झाली होती.

महाराष्ट्रातून कर्नाटक हद्दीतून गडहिंग्लज, चंदगड, आजरा याठिकाणी जाणाऱया चारचाकी वाहनधारकांच्या गाडीवर शिवसेना असा उल्लेख असल्यास त्यांना देखील कर्नाटकात प्रवेश नाकारण्यात आला.

येथील दूधगंगा नदीवरून सदर गाडय़ा परत महाराष्ट्रात पाठविण्यात आल्या. या ठिकाणी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय बी. एस. तळवार, खडकलाट पोलीस स्थानकाचे पीएसआय सुरेश मंटूर, निपाणी बसवेश्वर पोलीस स्थानकाच्या पीएसआय अनिता राठोड यांच्यासह एएसआय एस. ए. टोलगी व अन्य पोलीस तैनात केले होते.

Related Stories

रिटेल फार्मसी असोसिएशनतर्फे कोविड केअर सेंटरला औषध पुरवठा

Patil_p

परंपरेनुसार कार्तिकी एकादशी उत्साहात

Patil_p

खादरवाडीत चैतन्यमय वातावरणात होतोय दुर्गामाता दौड

Patil_p

प्रा. सुभाष सुंठणकर यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार

Amit Kulkarni

सकाळच्या सत्रातील बेंगळूर विमानसेवा पूर्ववत करा

Patil_p

कृषीपंपांचा वीजपुरवठा 15 दिवसांपासून बंद

Amit Kulkarni
error: Content is protected !!