तरुण भारत

बेकिनकेरे परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस : पिकांचे मोठे नुकसान

वन्य खात्याचे दुर्लक्ष, बंदोबस्त करण्याची मागणी

बेळगाव : तालुक्मयाच्या पश्चिम भागातील बेकिनकेरे, बसुर्ते, कोनेवाडी, अतिवाड गावांची शेतवाडी डोंगर पायथ्याशी आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांकडून मोठय़ाप्रमाणात नुकसान होत आहे. वनखात्याचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने दरवषी शेतकऱयांना मोठा फटका बसत आहे. परिसरातील डोंगर पायथ्याशी मोठय़ाप्रमाणात शेतीचे क्षेत्र आहे. यामध्ये शेतकऱयांनी मक्का, बाजरी, बिन्स, ऊस यासह भाजीपाल्यांची लागवड केली आहे. मात्र रात्रीच्यावेळी गवे व रानडुकरांचे कळप येवून हैदोस घालून पिके फस्त करत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर बनले आहेत.  परिसरातील शेतवडीत वन्यप्राण्यांचा रात्रीच्यावेळी मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे शेतकऱयांना शिवाराकडे जाणे धोक्मयाचे बनले आहे. उभ्या पिकात गव्यांचे कळप धुडघूस घालत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. काही शेतकऱयांनी शेतीला कुंपन घातले आहे. मात्र वन्यप्राण्यांचा हैदोस सुरुच असल्याचे शेतकरी सांगत आहेत. कर्नाटकाबरोबर महाराष्ट्राच्या सीमा हद्दीवर असलेल्या सुंडी, करेकुंडी, कौलगे, देवरवाडी, महिपाळगड आदी गावातील शेतकऱयांना वन्यप्राण्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महाराष्ट्र वनखातेदेखील उदासीन असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका मात्र शेतकऱयांना बसत आहे. रब्बी हंगामातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात वन्यप्राण्यांकडून नुकसान होत असल्याने वनखात्याने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे.

Advertisements

Related Stories

श्रीनगर येथील डेनेज वाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे

Omkar B

विनय कुलकर्णी यांची वैद्यकीय तपासणी

Amit Kulkarni

सर्व्हर डाऊनमुळे ई-केवायसीचे काम पुन्हा ठप्प

Patil_p

‘समुद्र’मध्ये अवतरले शिवा अन् सिद्धी!

Amit Kulkarni

विकेंड कर्फ्यूचा परिवहनला फटका

Amit Kulkarni

जिल्हाधिकारी आर.व्यंकटेशकुमार यांची बदली

Patil_p
error: Content is protected !!