तरुण भारत

प्रशासनाच्या हेकेखोर कारभाराला कंटाळून धुंदरेवाशीय छेडणार लाक्षणिक उपोषण

प्रतिनिधी / लांजा

लांजा नगरपंचायत व जिल्हा प्रशासन लांजा शहराच्या डंपिंग ग्राउंड जागेबाबत धुंदरेवाशीयाना ठोस माहिती देत नसून लांजा वाशीयांची एक प्रकारे दिशाभूल करत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या हेकेखोर कारभाराला कंटाळून प्रशासनाच्या विरोधात २६ जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचा सज्जड इशारा शहरातील धुंदरे गावच्या नागरिकांनी दिला आहे.

धुंदरे येथील प्रस्तावित डंपिंग ग्राउंड प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की सन २००८ साली डम्पिंग ग्राउंडसाठी लांजा नगर पंचायती मार्फत निविदा मागवण्यात आली होती. यासाठी येथील जागा मालक अरुण साखरे यांचा एकमेव प्रस्ताव आला होता. मात्र त्याचवेळी त्या जागेबाबत तेथील स्थानिक जनतेने यावर आक्षेप घेतला होता. कारण सदर प्रस्तावित डंपिंग ग्राउंड जागेच्या आसपास मानवी वस्ती आहे. तसेच या जागेजवळूण नदी वाहते. या नदीवर आगरवाडी, देवराई, गव्हाणे, झापडे, कांटे, देवधे, लांजा या गावांच्या नळपाणी योजना कार्यान्वित आहेत. त्यामुळे डम्पिंग ग्राउंडसाठी ही जागा घेऊ नये अशी मागणी येथील स्थानिक जनतेने नगरपंचायतीकडे केली होती. त्याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला होता. मात्र आजतागायत याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

या डंपिंग ग्राउंड जागेकडे जाण्यासाठी रस्ता देखील उपलब्ध नाही व लगत कब्जेदार यांची संमती किंवा त्यांना विश्वासात घेतले नसल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच दिनांक ३१/ ८ /२०२० रोजी उपविभागीय अधिकारी राजापूर यांनी नवीन डम्पिंग ग्राउंड जागेसाठी निविदा मागवल्या होत्या. त्यावेळी सहा निविदा नगरपंचायतीला प्राप्त झाल्या होत्या. त्यातील पाच अधिकृत म्हणून राहिल्या होत्या. या जागांवर प्रांत कार्यालयाकडून तलाठी, मंडळ अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तपासणी अधिकारी येऊन गेले. परंतु धुंदरे येथील प्रस्तावित डंपिंग ग्राउंड रद्द केला गेला की नाही याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

याबाबत लांजा नगरपंचायतीकडे लेखी विचारणा केली असता कोणतीही माहिती दिली जात नसल्याचे तक्रार कर्त्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबरोबरच पूर्वी डम्पिंग ग्राउंडसाठी प्रस्तावित केलेल्या गट नंबर २५२ या जागेचा संदर्भात कोणताही व्यवहार नगरपंचायतीकडून अधिकृत झालेला नसताना, स्थानिक ग्रामस्थ सचिन लिंगायत, रविंद्र कांबळे या दोघांवर मुख्याधिकारी नगरपंचायत लांजा यांनी कॅव्हेट दाखल केले आहे. त्यानंतर २५/ ९/ २०२० रोजी झालेल्या नगरपंचायतीच्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी लांजा यांनी चुकीच्या पद्धतीने विधाने केल्यानंतर त्यावर उपस्थित नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता.

अशाप्रकारे पहिला प्रस्ताव स्वीकारला अथवा नाकारला आहे का? त्याचे कोणतेही उत्तर दिलेले नसताना उपविभागीय अधिकारी राजापूर यांनी नवीन प्रस्ताव का मागवले? त्याचे कोठेही उत्तर दिले जात नाही. यावरून प्रशासन हे लांजा येथील लोकांची दिशाभूल करत असल्याचे दिसते. नगरपंचायतीच्या सभेमध्ये सर्व नगरसेवकांनी धुंदरे येथील साखरे यांच्या जागेला एकमुखी एकमुखी विरोध दर्शवला आहे. ही सर्व पार्श्वभूमी येत्या २६ जानेवारी रोजी सकाळी ९. ३० वाजता लाक्षणिक उपोषणास बसण्याचा इशारा रवींद्र लिंगायत, प्रसाद भाईशेटे, सचिन लिंगायत व ग्रामस्थांनी दिला आहे.

Advertisements

Related Stories

महामार्गावर गणेशभक्तांची कार उलटली

Patil_p

आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडेचा एच.एस.सी.चा निकाल १०० टक्के

Ganeshprasad Gogate

जिल्हा रुग्णालयाचे कँटिन सुरू

NIKHIL_N

काम ‘फ्रंटलाईन’चे, मात्र लाभ देण्यास नकार

NIKHIL_N

रत्नागिरीत महिलेवर खुनी हल्ला

Patil_p

आदर्श शाळांच्या अंतिम यादीत सिंधुदुर्गातील नऊ

NIKHIL_N
error: Content is protected !!