तरुण भारत

साळमाळगेवाडीत दूध व्यावसायिक तरुणाचा गळा चिरून खून

प्रतिनिधी / जत

जत तालुक्यातील साळमाळगेवाडी येथील अजित बाबासो खांडेकर वय (20) या युवकाचा जिरग्याळ रस्त्याच्या बाजूला अज्ञाताकडून गळा चिरून खून करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान घडली.

अजित खांडेकर यांची दुध डेअरी असुन वाडी वस्तीवर जाऊन दुध संकलन करीत असत. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता दुध संकलित करण्यासाठी घरातुन बाहेर पडला होता. साडेसात वाजता दूध संकलित करून दुध आपल्या सहकाऱ्यांकरवी जिरग्याळ येथील दूध संकलन केंद्रात दूध जमा करण्यास पाठवुन पुढील वस्तीवर दुध संकलनासाठी गेला होता.

रात्री आठ वाजच्या सुमारास एका वस्तीवरील दुध घेऊन येत असताना एक कि मी अंतरावर साळमाळगेवाडी हद्दीत अज्ञाताकडुन गळा चिरून खून करून , मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी परिसरातील शेतकऱ्यांना निदर्शनास आल्याने संबंधित व्यक्तीने जत पोलिस ठाण्यास व खांडेकर कुटुंबियांना कळविण्यात आले होते. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, निरीक्षक उत्तम जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी भेट दिली.

Advertisements

Related Stories

सांगली : पांडुरंग कोरेंचा स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा

Abhijeet Shinde

डीसीपीएस बांधवांच्या प्रश्नाकरिता शिक्षक परिषदेची सायकल रॅली

Abhijeet Shinde

इस्लामपुर भाजी मंडईसाठी १५ तर रस्ते विकासासाठी १० कोटी : मंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

Abhijeet Shinde

आशिष शेलार यांच्याकडून जिल्हा भाजपचा आढावा

Abhijeet Shinde

सांगली : काम सुधारा, अन्यथा कोविड सेंटरचा परवाना रद्द

Abhijeet Shinde

सांगली : मिरज-मालगांव रस्त्याचे रुंदीकरण करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!