तरुण भारत

हॅवेल्स इंडियाचा नफा तेजीत

वृत्तसंस्था/ मुंबई

स्वीच, फॅन्ससह विविध इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात कार्यरत असणाऱया हॅवेल्स इंडिया लिमिटेडचा नफा डिसेंबर तिसऱया तिमाहीत 74 टक्क्यांपर्यंत वाढला असल्याचे सांगण्यात येते.

Advertisements

डिसेंबर अखेर कंपनीचा एकत्रित नफा 350 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या वषी समान कालावधीत कंपनीने 200 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. कंपनीच्या महसुलातदेखील 39 टक्के इतकी भरघोस वाढ झाली आहे. कंपनीचा महसूल डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत 3 हजार 175 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागच्या वषी 2 हजार 273 कोटी रुपये होता. कंपनीचा एकूण खर्च सरासरी 2 हजार 744 कोटी रुपयांचा नोंदला गेला आहे. मागच्या वषीच्या तुलनेमध्ये खर्चामध्ये मात्र 32 टक्के इतकी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कंपनीचा स्वीच गिअर गटातील महसूल 737 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. लाइटिंग आणि फिक्चर्स गटातून कंपनीने 29 टक्के वाढीसह 362 कोटींचा महसूल मिळवण्यात कंपनीने यश मिळवले आहे.

Related Stories

‘झूम’ देणार गुगल-मायक्रोसॉफ्टला टक्कर

Omkar B

मॅप माय इंडियाचा येणार आयपीओ

Patil_p

‘कोका-कोला’ पुन्हा करणार कर्मचारी कपात ?

Patil_p

बँकिंग क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार

Omkar B

डार्क वेब-सायबर क्राईमचे अंडरवर्ल्ड

Patil_p

चार दिवसांच्या तेजीला पाचव्या दिवशी ब्रेक

Patil_p
error: Content is protected !!