तरुण भारत

3 वर्षांपासून ‘जिवंत’ सिद्ध करण्याची लढाई

न्यायाधीशाच्या चुकीमुळे मानले गेले मृत

फ्रान्समध्ये राहणाऱया 58 वर्षीय जीन पोचेन यांची कथा ऐकताना फिल्मी वाटते, जीन मागील तीन वर्षांपासून स्वतःला जिवंत घोषित करण्याच्या प्रयत्नात आहेत. न्यायाधीशाच्या चुकीमुळे 2017 मध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. शासकीय दस्तऐवजांमध्ये मृत असल्याने जीन यांना वाहन चालविता येत नाही, तसेच स्वतःच्या बँक खात्यांचाही वापर करता येत नाही. तसेच स्वतःचा उपचार करण्यास त्या आरोग्य विम्याचाही लाभ घेऊ शकत नाही.

Advertisements

त्यांचा बहुतांश वेळ कायदेशीर लढाई लढण्यात खर्ची पडत आहे. जीनच्या कंपनीच्या एका माजी कर्मचारीने भरपाईच्या मागणीसाठी 2014 मध्ये याचिका दाखल केली होती. प्रारंभी ही याचिका न्यायालयाने फेटाळली होती. परंतु संबंधित कर्मचारी वरिष्ठ न्यायालयांमध्ये दाद मागत राहिला. पण, यादरम्यान न्यायालयाने जीन आणि त्यांच्या कुटुंबाच्या कुठल्याच सदस्याला खटल्याशी संबंधित समन्स बजावला नाही. 2017 मध्ये जीन यांच्या न्यायालयातील वारंवार अनुपस्थितीमुळे त्यांना मृत मानले गेले आणि त्यांच्या पती-मुलाला 12,470 पौंड संबंधित कर्मचाऱयाला देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

या आदेशानंतरच जीन आणि त्यांच्या कुटुंबाला संबंधित प्रकार कळला होता. तेव्हापासून मी विचित्र भीतीच्या छायेत जगत आहे. रक्कम न दिल्याने अधिकाऱयांनी माझी कारच उचलून नेली आहे. आता माझ्या घरातील फर्निचर विकले जाण्याच्या वाटेवर असल्याची व्यथा जीन मांडत आहेत.

Related Stories

एच-1बी व्हिसा स्थगित होण्याची शक्यता

Patil_p

लहान मुलांच्या शिंकेतून कोरोनाचा प्रसार अधिक वेगात

datta jadhav

फिलिपाईन्सच्या अध्यक्षांकडून राजकीय संन्यासाची घोषणा

Patil_p

मेक्सिकोत मेट्रो ट्रेनसह पूल कोसळला; 15 ठार

datta jadhav

पाकला दणका; सौदी अरेबियाने रोखला कच्च्या तेलाचा पुरवठा

datta jadhav

लादेनच्या भावाच्या घराची होतेय विक्री

Patil_p
error: Content is protected !!