तरुण भारत

सहकारात सातत्यासाठी पीआर पाटील यांच्या सारखी माणसे घडावी लागतात – खा.शरद पवार

प्रतिनिधी / इस्लामपूर

पीआर पाटलांच भाग्य की त्यांची सार्वजनिक जीवणाची सूरूवात राजारामबापूंच्यापासून झाली. कशाची ही अपेक्षा न करणारा भरत सारखा भाऊ त्यांच्यारूपाने जयंतरावांना मिळाला आहे. नव्या पिढीला प्रोत्साहान देण्याच काम राजारामबापूंनी केले. कार्यकर्ते तयार करण्याची फॅक्ट्रीच त्त्यांच्याकडे होती. त्यातीलच एक पीआर पाटील आहेत. ५२ वर्ष सहकारात काम करणे सोप्पी गोष्ट नाही. यासाठी जयंतरावांची साथ त्यांना मिळाली आहे. उत्तम कारखाना चालवणे व त्यात सातत्य राखणे खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी पीआर पाटील यांच्या सारखी माणसे घडावी लागतात असे गौरवोद्गार खा. शरद पवार यांनी काढले.

राजारामबापू साखर कारखान्यानाचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांचा अमृतमहोत्सवी सपत्नीक सत्कार सोहळा पवार यांच्या हस्ते कुरळप या त्यांच्या गावी संपन्न झाला. यावेळी खा.श्रीनिवास पाटील, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे,खा. धैर्यशील माने, आ.मानसिंगराव नाईक, माजी खा.राजू शेट्टी, आ.मोहनराव कदम आ.अरुण लाड, आ.सुमनताई पाटील, आ.शेखर निकम उपस्थित होते

जयंत पाटील म्हणाले, सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करणार नेता म्हणजे पी.आर पाटील आहेत. राजारामबापूंच्या नंतर जबाबदारीची जाणीव पीआर दादांनी करून दिली. त्यांनी कायम संस्थेच्या हिताचे निर्णय घेतले. तालुक्यातील छोट्या, मोठ्या कामांना पाठबळ देण्याचे काम त्यांनी केले. बेरजेचे राजकारण कसे करायचे हे त्यांनी व राजारामबापूंच्या बरोबर काम करणार्या नेत्यांनी मला शिकवले. कारखान्यात दहा वर्ष अध्यक्ष म्हणून राहता येते मात्र त्यांच्यासाठी मी मंत्री असताना कायदा बदलून घेतला . म्हणून ते गेली पंचवीस वर्ष झाले ते कारखान्यांचे अध्यक्ष आहेत. एक प्रामाणिक नेता म्हणून त्यांचा सन्मान झाला आहे. यावेळी मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री विश्वजीत कदम, खा. श्रीनिवास पाटील, खा. धैर्यशील माने यांनी मनोगत व्यक्त केले.

साखर संघाच्या अध्यक्ष पदी पीआर पाटील

राज्य साखर संघाच्या अध्यक्ष पदी पीआर पाटील यांच्या नावाची घोषणा खा. शरद पवार यांनी या कार्यक्रमात केली. मार्च महिन्यात हे पद रिक्त होत आहे. या मुळे त्यांना मोठी संधी मिळाली आहे.

Advertisements

Related Stories

रोजगार हमी व ग्रंथालय समितीवर आ. विक्रमसिंह सावंत यांची निवड

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात केंद्रीय सैनिक स्कूल स्थापन करावे : खा. संजय पाटील

Abhijeet Shinde

सांगली : कुपवाडमध्ये चोरट्यांचा धुमाकुळ: रात्रीत दोन दुकाने फोडली,चोरटे सीसीटीव्हीत कैद

Abhijeet Shinde

कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना १० लाखांची मदत

Abhijeet Shinde

सांगली जिल्हय़ात विक्रमी 339 रूग्ण वाढले, सहा जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

पूर नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना – मंत्री जयंत पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!