तरुण भारत

सध्याच निवडणुका घेतल्यास मोदींची हॅट्ट्रिक

भाजपला स्वबळावर बहुमत शक्य ः सर्वेक्षणातून नरेंद्र मोदींची लोकप्रियता सिद्ध

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

देशात पुढील लोकसभा निवडणुका होण्यास अद्याप बराच कालावधी आहे, परंतु नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून येत आहे. आताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सहज बहुमत मिळवेल, असा होरा व्यक्त केला जात आहे. इंडिया टुडेच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या ‘मुड ऑफ द नेशन’च्या निरीक्षणानुसार, रालोआला 321 जागांवर विजय मिळू शकतो. यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये नोंदवण्यात आलेल्या निरीक्षणापेक्षाही आता आणखी पाच जागा वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

2019 मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा अजूनही कमीच आहे. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत रालोआने 357 जागांवर विजय मिळवला होता. दुसऱया बाजूला काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या जागांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. संपुआला 93 जागांवर समाधान मानावे लागेल. मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास रालोआला 43 टक्के मते मिळतील. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना 45 टक्के मते मिळाली होती. इंडिया टुडे आणि कार्वीच्या मूड ऑफ नेशन पोलमध्ये ही बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी यांना देशातील सर्वोत्कृष्ट पंतप्रधानपदाचा बहुमान मिळाला असून इंदिरा गांधी तिसऱया क्रमांकावर आहेत.

काँग्रेस ‘अर्धशतका’च्या आसपास

आज निवडणुका घेतल्या तर लोकसभेच्या 543 जागांपैकी 321 जागा भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीला मिळू शकतात, तर भाजपा स्वबळावर बहुमताचा आकडा पार करू शकेल आणि 291 जागा जिंकू शकेल. त्याचबरोबर, काँग्रेसप्रणीत यूपीएला 93 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर काँग्रेसला केवळ 51 जागा मिळतील तर इतरांना 129 जागा मिळतील. या सर्वेक्षणानुसार 3 जानेवारी ते 13 जानेवारी 2021 दरम्यान देशातील सुमारे 12,232 लोकांना त्यांचे मत विचारण्यात आले. या सर्वेक्षणात 67 टक्के ग्रामीण आणि 33 टक्के शहरी लोकांचा समावेश होता.

मुख्यमंत्र्यांमध्ये योगी अव्वल

या सर्वेक्षणात देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्याबद्दल मत विचारले असता 25 टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देशाचे सर्वश्रे÷ मुख्यमंत्री म्हटले आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱया क्रमांकावर राहिले. त्यांना 14 टक्के लोकांनी सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा या यादीत तिसरा क्रमांक आहे.

केंद्रीय मंत्र्यांमध्ये अमित शहा सर्वोत्कृष्ट

मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वोत्कृष्ट मंत्र्याच्या क्रमवारीत 39 टक्के लोकांनी अमित शहा यांना सर्वोत्कृष्ट मंत्री म्हटले आहे. तर 14 टक्के लोकांनी राजनाथ सिंग यांना अनुकुलता दर्शवली. नितीन गडकरी या यादीत तिसऱया क्रमांकावर असून त्यांना दहा टक्के लोकांनी सर्वोत्कृष्ट मंत्री ठरवले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना 8 टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे.

Related Stories

”मोदींनी काँग्रेसकडे यावं, आमचे अर्थतज्ज्ञ मदत करतील” – राहुल गांधी

Abhijeet Shinde

हिमाचल प्रदेश : मेडिकल कॉलेजची महिला चिकित्सक चंदीगडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

दहशतवादी कारवायांचा कठोरपणे बीमोड करू!

Patil_p

पेट्रोल, डिझेल दरात पुन्हा वाढ

Amit Kulkarni

पीपीई किट उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर!

Omkar B

सीडीएस बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू

Amit Kulkarni
error: Content is protected !!