तरुण भारत

मडगावातून दोन मुलींचे अपहरण फातोर्डा येथील संशयिताच्या मागावर पोलीस

प्रतिनिधी / मडगाव

चंद्रावाडो-फातोर्डा येथील एका संशयित आरोपीने 16 वर्षीय दोन मुलींचे अपहरण केले आहे. या प्रकरणी मडगाव पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 16 वर्षीय दोन मुलींचे अपहरण करण्यात आल्याने सध्या पोलीस खातेही चक्रावून गेलेले आहे.

Advertisements

संशयित आरोपी मौलवी अब्दुल देवगिरी या 19 वर्षीय संशयिताच्या शोधार्थ सध्या मडगाव पोलीस आहेत.

नावेली येथे राहणाऱया एका 25 वर्षीय युवकाने या प्रकरणी मडगाव पोलीस स्थानकात तक्रार केलेली आहे. 20 जानेवारी 2021 रोजी सकाळी 8.45 वाजता आपली बहिण घरातून बाहेर गेली होती. तिच्या सोबत तिची 16 वर्षीय आणखी एका मुलीचेही संशयिताने अपहरण केलेले असल्याचे या तक्रारीत म्हटलेले आहे.

या अपहरण प्रकरणाचा उपनिरीक्षक स्टेन्ली गोम्स तपास करीत असून   संशयित आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहतेच्या 363, गोवा चिल्ड्रन्स ऍक्ट-2003 च्या 8 व्या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

अपहरणाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास आरोपीला कमाल 7 वर्षाची कैदेची शिक्षा आणि दंडाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. तपास कामात इतर पोलीस स्थानकातील पोलीस अधिकाऱयांचे साहाय्य घेण्यात येत असल्याची माहिती सुत्रानी दिली.

Related Stories

आयआयटी प्रकल्प मेळावलीतून तात्काळ हटवा !

Patil_p

सुरक्षित अंतर ठेवूनच खरेदी-विक्री करा

Patil_p

मांद्रे नाईकवाडा सरकारी प्राथमिक शाळेत ऑनलाईन स्पर्धा

Patil_p

मगो फुटीर आमदारांविरोधातील अपात्रता याचिका आता 26 रोजी

Patil_p

भाजीच्या वाहनांवर मोले चेकनाक्यावर बंदी घालावी

Omkar B

मांद्रे येथील सिद्धांत गोवेकरला एम्स हृषिकेषमध्ये प्रवेश

Patil_p
error: Content is protected !!