तरुण भारत

कोरोना योद्धय़ांना अनगोळमध्ये लसीकरण

बेळगाव : अनगोळ येथील आरोग्य केंद्रात कोरोना योद्धय़ांना लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने करण्यात येत असलेल्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सरकारी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी कर्मचारी, सुपरवायझर, आशा कार्यकर्त्या तसेच आरोग्य अधिकारी व कर्मचाऱयांना लसीचा डोस देण्यात येत आहे. यावेळी अनगोळ येथील माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे, डॉ. संतोष पाटील, आरोग्य केंद्राचे डॉ. व्ही. वाय. कडोलकर उपस्थित होते. यावेळी मोहन भांदुर्गे म्हणाले, गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटात सर्व कोरोना योद्धय़ांनी आपला जीव धोक्मयात घालून नागरिकांची जी सेवा केली आहे ती उल्लेखनिय आहे. त्याबद्दल सर्वांचे आम्ही अभिनंदन करत आहोत. आता पहिला मान या योद्धय़ांना दिल्यामुळे ही समाधानकारक बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अनगोळ भागातील अंगणवाडी सेविका, आरोग्याधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Related Stories

दिवाळीच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Amit Kulkarni

पंचमसाली लिंगायत समाजाचा 2ए प्रवर्गामध्ये समावेश करा

Rohan_P

चार एकरातील ऊस जळून खाक

Patil_p

मराठा मंडळ दंत वैद्यकीय महाविद्यालयात कोविड तपासणी केंद्र सुरू

Amit Kulkarni

घरात उपचार घेतल्यामुळे अन्य सदस्यांना बाधा

Amit Kulkarni

पूरस्थितीचा सामना करण्यासाठी मनपाकडून आवश्यक उपाययोजना

Patil_p
error: Content is protected !!