तरुण भारत

देवबाग-सदाशिवगड येथील नृसिंह यात्रा 25 पासून

प्रतिनिधी / कारवार

देवबाग-सदाशिवगड येथील श्री नृसिंह देवाची यात्रा दि. 25 आणि 26 जानेवारी होणार आहे. दि. 25 रोजी सकाळी 9 वाजता नृसिंह सिट्टा-देवबाग येथून श्री मूर्ती परिवारसह देवस्थानातून निघून चिताकुला येथील श्री महामाया देवस्थानात आगमन होणार आहे. त्यानंतर श्रीची मूर्ती तारिवाडा येथे दाखल होऊन काळी नदीतून आणि त्यानंतर अरबी समुद्रात होडीद्वारे कुरुमगड बेटावर दाखल होणार आहे. कुरुमगड बेटावरील सुप्रसिद्ध नृसिंह देवस्थानात श्रीचे आगमन झाल्यानंतर श्रींची पूजा, आरती, नैवेद्य व नंतर विविध धार्मिक विधी झाल्यानंतर संध्याकाळी श्रींचे नृसिंहशिट्टा-देवबाग येथे आगमन होणार आहे. त्यानंतर यात्रा भरणार आहे.

Advertisements

  रात्री 11 वाजता श्री मारुती नवतरुण नाटय़ मंडळ, सी-बर्ड कॉलनीतर्फे ‘पापद हणेगे, पुण्यद सिंधूर’ या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. मंगळवार दि. 26 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 1 पर्यंत अभिषेक, तुलाभार आणि वस्तूंचा लिलाव होणार आहे. सायंकाळी 3 नंतर होणाऱया दहीकाल्याच्या कार्यक्रमाने वार्षिकोत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती श्री नृसिंह सेवा समितीतर्फे देण्यात आली आहे.

कुर्मगडावरील नृसिंह देवाची यात्रा 28 रोजी

कडवाड येथील श्री नृसिंह मंडळातर्फे साजरी करण्यात येणारी कुरुमगडावरील नृसिंह देवाची यात्रा 28 आणि 29 रोजी होणार आहे. कडवाड येथून सकाळी निघालेली श्रीची पालखी 10 वाजता कुरुमगडावर दाखल होणार आहे. 11 वाजता दर्शनाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 पर्यंत श्रीस अभिषेक तुलाभार, महापूजा व नैवेद्य अर्पण आदी कार्यक्रम होणार आहेत. 28 तारखेला श्रींचे कुरुमगडावर वास्तव्य राहणार असून संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत भजनाचा कार्यक्रम व महापूजा होणार आहे. 29 रोजी श्रींची पालखी निघून अळवेवाडा-कोडीबाग, नंदनगद्दा मार्गे कडवाड येथील मूळ स्थानावर दाखल होणार आहे.

समुद्रातील यात्रा म्हणून प्रसिद्ध

ही यात्रा समुद्रातील जत्रा म्हणूनच प्रसिद्ध आहे. कारवारपासून 5 ते 6 कि. मी. अंतरावर अरबी समुद्रात असलेल्या कुरुमगडावर (बेटावर) जलमार्गाने जावे लागते. या यात्रेत गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रासह अन्य राज्यातील हजारो श्रद्धाळू सहभागी होतात. तथापि यावर्षी जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार के. यांनी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांकेतिकपणे साजरी करण्याची सूचना संबंधितांना केल्याने यावर्षी यात्रोत्सवाला आणि आनंदाला मुकावे तर लागणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related Stories

कोरोना बळींची मालिका सुरूच

Rohan_P

लोकमान्य ग्रंथालयात अब्दुल कलाम जयंती साजरी

Patil_p

ग्राम पंचायत निवडणूक, क्लब रोडवर वाहतूक बंदी

Patil_p

हॉस्टेल्स बंद : विद्यार्थ्यांची परवड सुरू

Amit Kulkarni

शहापूर येथील तरुणावर हल्ला वादावादीनंतर घडला प्रकार

Omkar B

तंबाखू सौद्यांना आजपासून सुरुवात

Patil_p
error: Content is protected !!