तरुण भारत

ठसठसणारी शीर

काहींच्या पोटर्यांवर, मांडय़ांवर निळसर वाहिन्यांचे जाळे गडद झालेले दिसते. तट्ट फुगलेल्या शीरा वेदना देत राहतात. चाळिशीनंतरच्या स्त्रियांमध्ये पुरूषांपेक्षा या व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास अधिक होताना दिसतो.

 • पायातून अशुद्ध रक्त हृदयाकडे जाताना वाटेतल्या झडपा सैल होतात आणि रक्त पुन्हा खालच्या बाजूकडे वळते. त्यावेळीच खालूनही वर रक्त सरकत असते. त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दाब येऊन त्या फुगू लागतात.
 • केवळ दिवसायला वाईट एवढेच हे दुखणे नसते. त्यामुळे पायात जडपणा येऊ लागतो. पायांना सूज येते. वेदना होतात. पोटर्यात गोळे येतात.
 • यावर उपाय काय?
 • सतत नुसतेच उभे राहून काम करणे टाळा.
 • अधूनमधून कदमताल करा.
 • चवडय़ांवर उभे राहा.
 • कमरेला घट्ट बसणारे कपडे, पट्टे टाळा.
 • पायांची अढी घालून बसून नका. पाय उंचावर ठेवून बसा.
 • पाण्यात चालण्याचा व्यायाम खूप उपयुक्त ठरेल.
 • झोपताना पायाखाली उशी घ्या.
 • झोपण्यापूर्वी पाय गरम पाण्यात बुडवा. पाय गरम झाल्यावर थंड पाण्यात बुडवा. पुन्हा गरम पाण्यात रक्तप्रवाहाचा वेग वाढू द्या. मग हलक्या हाताने पायांना खालपासून वरपर्यंत समाज करा.
 • हे उपाय प्राथमिक स्तरावरचे आहेत. या उपायांनी फरक न पडल्यास तज्ञ डॉक्टरांचे उपचार घेणे आवश्यक आहे.

Related Stories

जेवणानंतर चहा घेताय

Amit Kulkarni

गर्भावस्थेत मॅग्नेशियम…जागरणांपासून मुक्तता

Patil_p

राज्यात आरोग्य विभागाची मेगाभरती – आरोग्यमंत्री राजेश टोपे

triratna

धोका ‘ब्लॅक फंगस’चा

Omkar B

मार्जारासन

Omkar B

N-95 मास्क कोरोना विषाणूचे संक्रमण रोखू शकत नाही

datta jadhav
error: Content is protected !!