तरुण भारत

अमेरिकेत परदेशी प्रवाशांना कोरोना चाचणी, विलगीकरण अनिवार्य

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

कोरोनाविरुद्ध लढा अधिक तीव्र करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्रीय रणनीती आखली आहे. अमेरिकेत परदेशी प्रवाशांना कोरोना चाचणी आणि विलगीकरण बंधनकारक करण्यात आली आहे. बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये यासंदर्भातील आदेशावर स्वाक्षरी केली.

Advertisements

बायडेन म्हणाले, परदेशातून अमेरिकेत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने विमानात बसण्यापूर्वी कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. तसेच अमेरिकेत आल्यानंतर त्यांना विलगीकरणात रहावे लागणार आहे. 

दरम्यान, अमेरिकेत कोरोनाबधितांची संख्या 2.5 कोटींवर पोहचली असून, 4.24 लाख रुग्णांचा बळी गेला आहे.

Related Stories

ट्रम्प यांचे फेसबुक अकौंट 2 वर्षांसाठी निलंबित

Patil_p

नवीन नकाशाबाबत नेपाळ संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आज मतदान

datta jadhav

मालीमध्ये सैनिकांचे सरकारविरोधी बंड; पंतप्रधानांसह राष्ट्रपतींना घेतले ताब्यात

datta jadhav

पाकमध्ये हिंदू शिक्षिकेचे बळजबरीने धर्मांतर

Patil_p

व्हिएतनाममध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट

Patil_p

हिटलरचे आलिशान हॉटेल ओसाड

Patil_p
error: Content is protected !!