तरुण भारत

साताऱ्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुण-तरुणीचा मृत्यू

ऑनलाइन टीम / सातारा : 

साताऱ्यातील जकातवाडी आणि डबेवाडी येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुण-तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Advertisements

देवानंद गोरखनाथ लोंढे (वय 25, जकातवाडी) आणि रुपाली बबन माने (22, डबेवाडी) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 23 डिसेंबरला एका  पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने माने आणि लोंढे या दोघांसह तीन गावातील 15 जणांना चावा घेतला होता. या सर्वांवर उपचार सुरू होते. दरम्यान, रुपाली माने हिला 8 जानेवारीला उलट्यांचा त्रास झाला. त्यानंतर तिला सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने तिला 10 जानेवारीला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 जानेवारीला तिचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

तर देवानंद लोंढे यांनाही त्रास जाणवू लागल्याने 19 जानेवारीला त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुण्यातील नायडू रुग्णालयात हलविण्यात आले. 21 जानेवारीला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Related Stories

अपघात प्रकरणी महामार्ग विभागावर गुन्हा दाखल करा

Patil_p

वडापाव चालकाची गळफास घेवून आत्महत्या

Patil_p

ह्यांना काय जिल्हाधिकायांनी वेगळा नियम लावलाय का?

Patil_p

जिल्हय़ातील तालुका रुग्णालयांची क्षमता वाढवा

Patil_p

नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी

datta jadhav

बांधकाम साहित्य चोरीप्रकरणी दोघांवर गुन्हा

Patil_p
error: Content is protected !!