तरुण भारत

राशिभविष्य

रविवार दि. 24 ते 30 जानेवारी 2021

मेष

Advertisements

या सप्ताहात कुंभ राशीत बुध, मकरेत शुक्र प्रवेश करीत आहे. ग्रहांचा तुम्हाला चांगला पाठिंबा आहे. त्यामुळे धंद्यात,नोकरीत तुमची प्रगती होईल. जुने येणे वसूल करा. नवीन ओळखीचा उपयोग करता येईल. संसारात शुभ समाचार मिळेल.  राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण तुम्ही देऊ शकाल. अधिकार तुम्हाला मिळेल. किचकट प्रश्न मार्गी लावा. शेतकऱयाला फायदा होईल. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगती कराल. नावलौकिक मिळेल.

वृषभ

या सप्ताहात कुंभेत बुध, मकरेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुमच्या धंद्यात सुधारणा होईल. नवे काम मिळेल. मागील येणे वसूल करा. नोकरीत प्रगती होईल. शब्द जपून वापरा. संसारातील चिंता कमी होईल. प्रकृती सुधारेल. तणाव कमी करू शकाल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रसिद्धी मिळेल. जनहिताचा प्रश्न सोडवा. शेतकरी वर्गाला चांगले दिवस असतील. माल विकला जाईल. कला, क्रीडा, शिक्षणात यश मिळेल. वाहन जपून चालवा.

मिथुन

या सप्ताहात कुंभेत बुध, मकरेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात, नोकरीत नम्रपणे वागा. अरेरावी कुठेही करू नका. मानसिक, शारीरिक तणाव राहील. कामात चूक करू नका. शेतकरी वर्गाला सावधपणे पीक रक्षण करावे लागेल. जीवनाला कंटाळू नका. व्यसनाने नुकसान. सामाजिक, राजकीय कार्यात अडचणी येतील. कायदा पाळून निर्णय घ्या. चुकीचा शब्द वापरू नका. संसारात चिंता निर्माण होईल. दडपण येईल. काम, खर्च वाढेल.

कर्क

या सप्ताहात कुंभेत बुध, मकरेत शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणी येतील. त्यानंतर तुमची कामे होतील. धंद्यात जम बसेल. कठोर शब्द वापरू नका. नोकर माणसांना जपावे लागेल. नोकरीत वर्चस्व राहील. संसारातील समस्या कमी होईल. कर्जाचे काम मार्गी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती कराल. मान-प्रति÷ा मिळेल. मंगळवारी क्षुल्लक वाद वाढवू नका. शेतकरी वर्गाला उत्साह वाटेल. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षणात यश मिळेल.

सिंह

या सप्ताहात कुंभेत बुध, मकरेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात संयमाने, विचाराने निर्णय घ्या. मोहाला बळी पडू नका. नोकरी टिकवा. वरि÷ांना दुखवू नका. संसारात चिंता वाटेल. मनस्ताप होईल. खर्च वाढेल. मौल्यवान वस्तू नीट सांभाळा. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी वाढतील. लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. दूर दृष्टिकोन ठेवा. मोठेपणाच्या फंदात पडू नका. कला, क्रीडा, शिक्षणात मेहनत घ्या. मैत्री टिकवा.

कन्या

या सप्ताहात कुंभेत बुध, मकरेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यातील समस्या लवकर सोडवा. प्रश्न किचकट होईल. शब्द जपून वापरा. करारात फसू नका. नोकरीत प्रभाव पडेल. नवीन ओळख होतील. राजकीय, सामाजिक कार्यात यश मिळेल. तुम्हाला मोठेपणा मिळेल. संसारात पत्नी मुलांचे सहकार्य चांगले मिळेल. कर्जाचे काम होईल. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगती होईल. दुखापत टाळा. शेतकरी वर्गाला दिलासा देणारी घटना घडेल.

तुळ

या सप्ताहात कुंभेत बुध, मकरेत शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धंद्यात अडचणी येतील. प्रवासात घाई करू नका. दुखापत होईल. उधारी वाढवू नका. शेतकरी वर्गाचा अंदाज थोडा चुकेल. रागावर ताबा ठेवा. नोकरीत वरि÷ांच्या बरोबर चर्चा करताना प्रसंगावधान ठेवा. तणाव वाढू शकतो. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर जबाबदारी टाकली जाईल. नम्रता ठेवा. कला, क्रीडा, शिक्षणात जिद्द ठेवा.

वृश्चिक

या सप्ताहात कुंभेत बुध, मकरेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात नवा प्रयत्न यशस्वी होईल. मोठे कंत्राट मिळवता येईल. थकबाकी वसूल करा. विरोधाला उत्तर देतांना तुमचे बुद्धिचातुर्य महत्त्वाचे ठरेल. नोकरीत कठीण कामे पूर्ण करा. संसारातील तणाव कमी करता येईल. वैवाहिक सौख्यावर लक्ष द्या. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढेल. शत्रूला धडा शिकवाल. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगती होईल.

धनु

या सप्ताहात कुंभेत बुध, मकरेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुमच्या धंद्यात जम बसवा. किरकोळ अडचणी येतील. कायदा पाळा. मागील येणे वसूल करा. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. कामही वाढेल. संसारात चांगली घटना घडेल. राजकीय, सामाजिक कार्यात, दौऱयात अडथळे येतील. गंभीरपणे वाद घालू नका. नवे नियोजन करता येईल. ओळखी वाढतील. कला, क्रीडा, शिक्षणात चांगली संधी मिळेल.

मकर

या सप्ताहात कुंभेत बुध, तुमच्याच राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात मागे राहू नका. कोणतीही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. किरकोळ कारणारे राग वाढू शकतो. नोकरीत वरि÷ तुमच्या कामाची तपासणी करतील. तुमचे महत्त्व वाढेल. संसारातील समस्या कमी होईल. शारीरिक, मानसिक तणाव कमी होईल. राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण मिळेल. प्रति÷ा वाढेल. कला, क्रीडा, शिक्षणात यशस्वी व्हाल.

कुंभ

या सप्ताहात तुमच्याच राशीत बुध, मकरेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात गोड बोलून रहा. उधारी वाढवू नका. व्यवहारात लक्ष ठेवा. नोकरीत नम्रपणे तुमचे मत मांडा. काम वाढेल. कायदा पाळा. संसारात कामे वाढतील. वयस्कर व्यक्तीची चिंता वाटेल. स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. मौल्यवान वस्तू सांभाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तटस्थपणे पहाणी करा. नीट अभ्यास करून बोला. कला, क्रीडा, शिक्षणात मेहनत घ्या.

मीन

या सप्ताहात कुंभेत बुध, मकरेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात आळस न करता कामे मिळवा. थकबाकी मिळवा. नवे परिचय फायदेशीर ठरतील. नोकरीत तुमच्या कामाची प्रशंसा होईल. बढती मिळेल. संसारातील कामे करून घ्या. जवळच्या लोकांना खूष करता येईल. राजकीय सामाजिक कार्याला  वेगाने पुढे नेता येईल. कठीण कामे करून घ्या. कला, क्रीडा, शिक्षणात नावलौकिक मिळेल. मागे राहू नका.

Related Stories

राशीभविष्य बुध. दि. 6 ते 12 मे 2020

Omkar B

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य रविवार दि. 3 मे 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 24 ऑगस्ट 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 27 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 23 एप्रिल 2020

Patil_p
error: Content is protected !!