तरुण भारत

चीन अन् भारत यांच्यात आज सैन्यस्तरीय चर्चा

नवी दिल्ली  

 पूर्व लडाखमध्ये मागील 9 महिन्यांपासून भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही देशांदरम्यान सैन्य कमांडर स्तरीय बैठक होणार आहे.  दोन्ही देशांदरम्यान ही नववी बैठक आहे. भारताकडून यंदाच्या चर्चेत काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. मागील काही बैठकांप्रमाणेच यावेळीही विदेश मंत्रालयाचे प्रतिनिधी या बैठकीत सामील होतील.

दोन्ही देशांदरम्यान चुशूल सेक्टरसमोर चीनच्या मोल्डोमध्ये ही बैठक होणार आहे. यापूर्वी दोन्ही देशांमधील अखेरची सैन्यस्तरीय बैठक 6 नोव्हेंबर रोजी पार पडली होती. सुमारे साडेतीन महिन्यांपूर्वी भारतीय सैनिकांनी पूर्व लडाखमध्ये पँगोंग सरोवरच्या दक्षिण काठावर सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण मुखपरी, रेचिन ला आणि मगर हिल भागातील अनेक उंच ठिकाणांवर नियंत्रण मिळविले होते.  भारतीय सैन्याने ही कारवाई 29-30 ऑगस्टदरम्यान रात्री पीपल्स लिबरेशन आर्मीकडून धमकाविण्याच्या प्रयत्नानंतर केली होती. चीनच्या सैनिकांनी एप्रिलपूर्वीच्या स्थितीत परतावे असे भारताने ठणकावून सांगितले आहे. तर चीन भारतीय सैनिकांना मागे घेण्याची मागणी करत आहे.

Related Stories

अनंतनाग : दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद; एका मुलाचाही मृत्यू

datta jadhav

उदयनराजे, रामराजे यांच्यात जादू की झप्पी…आता नो चुप्पी

Shankar_P

11 पाकिस्तानी शरणार्थींचा जोधपूरमध्ये संशयास्पद मृत्यू

Patil_p

हिमाचल प्रदेश : क्वारंटाइन केंद्र आणि आंतरराज्यीय सीमांवर आता शिक्षकांची नियुक्ती 

pradnya p

भूमी अधिग्रहणाच्या विरोधात दगडफेक

Patil_p

यंदा मंत्र्यांनी नवी वाहने खरेदी करू नये : योगी आदित्यनाथ

datta jadhav
error: Content is protected !!