तरुण भारत

मित्रास काहीतरी सांगितल्याच्या गैरसमजातून एकास मारहाण

प्रतिनिधी / कोल्हापूर

मित्रास काहीतरी सांगितल्याच्या गैरसमजातून जुना बुधवार पेठेत एकास मारहाण करून जखमी करण्यात आले. याबाबत राहूल राजेंद्र काकरे (वय 21, रा. डी.वार्ड, जुना बुधवार पेठ) याने फिर्याद दिली आहे. त्यानूसार अभिषेक अनिल भोसले ( रा. पापाची तिकटी, बजाप माजगांवकर तालीमजवळ), सत्यम मुंदडे(रा. शनिवारी पेठ), ताहीर शेख (रा. घिसाड गल्ली) या संशयितां विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Advertisements

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी व संशयित अभिषेक हे दोघे मित्र आहेत. फिर्यादीने त्याच्याबद्दल त्याच्या मित्रांना काहीतरी सांगितल्याचा गैरसमज करून घेतला. त्यामुळे फिर्यादीच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास संशयित अभिषेकसह सत्यम व ताहीर यांनी लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारहाण केली. यावेळी संशयित सत्यम याने हातातील काचेच्या बाटलीने मारण्याचा प्रयत्न केला. अशी तक्रार फिर्यादीने लक्ष्मीपुरी पोलीसांत दिली आहे. त्यानूसार तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक बाटुंगे करीत आहेत.

Related Stories

कोल्हापूर : अठरा वर्षांवरील सर्वांना मिळणार लस

Abhijeet Shinde

प्रांत कार्यालयात होणार दुमजली वाहनतळ

Patil_p

मेडिकल कॉलेजला यशवंतरावांचे नाव द्या

Patil_p

परीक्षा घोटाळा : 500 परीक्षार्थींकडून प्रत्येकी 5 लाख घेतल्याचे स्पष्ट

Sumit Tambekar

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी : पोलीस उपनिरीक्षकासह सासू, ननंद, मित्रावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना मुंबईला हलवणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!