तरुण भारत

ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन 26 जानेवारी ऐवजी आता 29 जानेवारीला होणार

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन 26 जानेवारी रोजी होणार होते पण 29 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. त्यावेळी सर्वांच्या उपस्थितीत ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहीती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

Advertisements

  या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन 29 जानेवारी रोजी सकाळी  10 वाजता विधान परिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सहकार व पणन मंत्री व सातारा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते होणार आहे. यावेळी गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले,  खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मोहनराव कदम, आमदार प्रा.जयंत आसगांवकर, आमदार अरुण लाड,आमदार श्री. छ. शिवेंद्रसिहराजे भोसले, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे,  आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा सी. जी., सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे  मुख्य अभियंता एस.एस. साळुंखे, पुणे प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता आबासाहेब चौगुले, सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्ष्क अभियंता स.गो. मुनगिलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे, सहायक अभियंता राहुल अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Related Stories

फलटण तालुक्यात 6 कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण आढळले

Patil_p

ओमिक्रॉनमुळे बेल्जियममध्ये निर्बंधांना विरोध करताना हिंसाचार

Sumit Tambekar

सांगली : संजनाची जागतिक कुमारी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Abhijeet Shinde

जम्मू काश्मीर : गंदरबलमध्ये अतिवृष्टी, ढगफुटीने उडाला हाहाकार

Abhijeet Shinde

हॉटेल राधिका पॅलेसमध्ये कोरोना सेंटर

Patil_p

राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत म्हणाले…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!