तरुण भारत

पोवई नाक्यावर उभा राहणार ’आय लव्ह सातारा’ सेल्फी पॉईंट

आ. शिवेंद्रसिंहराजे, सौ. वेदांतिकाराजे करणार स्वखर्चातून सुशोभीकरण

प्रतिनिधी/ सातारा

सातारा- आपल्या सातारा शहराचं नाक म्हणून पोवई नाक्याची ख्याती आणि ओळख आहे. पोवई नाका अर्थात छ. शिवाजी महाराज सर्कल येथे ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाल्यानंतर आता याच पोवई नाक्यावर ’आय लव्ह सातारा’ आयलँड, सेल्फी पॉईंटची लवकरच उभारणी होणार आहे. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच स्वखर्चातून सेल्फी पॉईंट उभारणीसह पोवई नाका येथे सुशोभीकरण केले जाणार आहे. 

प्रत्येक शहराची एक खास ओळख असते. सातारा शहर हे तर ऐतिहासिक शहर असून पोवई नाका हे सातारा शहराचे महत्वाचे ठिकाण मानले जाते. याच पोवई नाक्यावर आठ रस्ते एकत्र येतात आणि कराड, कोरेगाव, माण, फलटण, खंडाळा, वाई, महाबळेश्वर तालुक्यातून याच ठिकाणी प्रथम प्रवेश होतो. त्यामुळे पोवई नाक्याला ऐतिहासिक आणि विशिष्ट स्थानिक असे महत्व आहे. याच पोवई नाक्यावर नुकतीच ग्रेड सेपरेटरची उभारणी झाली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. त्यामुळे सातारकरांना नेहमीच अभिमानास्पद असणाया पोवई नाक्यावर आ. शिवेंद्रसिंहराजे आणि सौ. वेदांतिकाराजे यांच्या संकल्पनेतून भारदस्त अशा सेल्फी पॉईंटची उभारणी केली जाणार आहे. 

कोल्हापूर, कराड यासह अनेक शहरांमध्ये सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर सातारा शहराची आगळी वेगळी ओळख सांगणारा आय लव्ह सातारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी भव्यदिव्य सुशोभीकरण करण्यात येणार असून हा आयलँड लक्षवेधी असणार आहे. सातारकरांसह बाहेरून येणारे पर्यटक, प्रवाशी यांच्यासाठी हा सेल्फी पॉईंट एकप्रकारचे पर्यटनस्थळ असणार आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे आणि सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या स्वखर्चातून या पॉईंटची उभारणी केली जाणार असून या सेल्फी पॉईंटची सातारकरांना उत्सुकता लागून राहिली आहे.  

Related Stories

तीर्थक्षेत्र जेजुरीला मिळाला थ्री स्टार मानांकनाचा दर्जा

Patil_p

जिल्हा बँकेत नोकरभरतीच्या नावाखाली लूट

Patil_p

हातकणंगले: पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल

Shankar_P

लॉकडाऊनमधील सवलतींचा गैरफायदा घेवू नका : नगराध्यक्षा माधवी कदम

Shankar_P

शहीद संदीप सावंत अनंतात विलीन

Patil_p

सातारा : कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी सूचनांचे पालन करा : जिल्हाधिकारी

triratna
error: Content is protected !!