तरुण भारत

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोघांचा अंत

उपचार घेत असताना जकातवाडी, डबेवाडीतील तरुण-तरुणीचा मृत्यू

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरालगत असलेल्या सोनगाव कचरा डेपोच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा सतत वावर असतो. याच भटक्या कुत्र्यांमधील एक कुत्रा गेल्या महिन्यात पिसाळले होते. त्या कुत्र्याने दि. 23 डिसेंबर 2020 रोजी तब्बल तीन गावातील पंधरा जणांचा चावा घेतला होता. त्याच कुत्र्याच्या हल्यात गुरांवर आणि शेळीवर हल्ला केला होता. हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी डबेवाडीच्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोन दिवसांपूर्वी जकातवाडीतील युवकाचा उपचारादरम्यान पुणे येथे मृत्यू झाला. डबेवाडीतील युवतीचे नाव रुपाली माने (वय 21) आणि जकातवाडीतील युवक देवानंद लोंढे (वय 25) अशी दोघांची नावे आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

सोनगाव कचरा डेपोमुळे अनेक भटकी कुत्री जकातवाडी, डबेवाडी, सोनगाव, आंबवडे, भेंदवडे परिसरात आहेत. याच कुत्र्यापैकी एक कुत्रा दि. 23 डिसेंबर रोजी दिसेल त्याला चावत सुटले होते. डबेवाडीमध्ये रुपाली माने ही कामावर जाताना तिच्या अगोदर पायाला चावले. नंतर डोक्याला चावले. तसेच पुढे त्याच गावातील वंदना रसाळ, लिलाबाई माने, संगीता माने, तसेच आंबवडे खुर्द येथील रवी सुर्वे यांच्यासह जकातवाडीतील देवानंद लोंढे हा रानात काम करत होता. त्याला पाठीमागून येवून मानेजवळ चावा घेतला होता. तर त्याच कुत्र्याने गावातल्या दुसऱया कुत्र्याचा चावा घेतला. शेळय़ा व गुरांनाही चावा घेतल्याने ग्रामस्थांनी त्या कुत्र्याचा शोध त्याच दिवशी घेतला. त्या पिसाळलेल्या कुत्र्याने ज्यांना ज्यांना चावा घेवून जखमी केले होते त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यापैकी देवानंद लोंढे आणि रुपाली माने या दोघांना कुत्र्याने जास्त जखमी केले होते. त्यांनी उपचार घेतले अन् घरीच थांबले होते. त्याचमुळे रुपाली माने या युवतीचा गेल्या पाच दिवसांपूर्वी तर देवानंद लोंढे याचे डोके दुखू लागल्यामुळे त्याला उपचारासाठी अगोदर जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथून पुढे त्याला पुणे येथे हलवा असे सांगण्यात आले. पुणे येथे नायडू रुग्णालयात देवानंद लोंढे यास रेबीज झाल्याचे निदर्शनास आले. त्याला वाचवण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱयांनी प्रयत्न केले. परंतु त्याचा दि. 21 रोजी त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

निष्काळजी प्रशासनानेमुळे दोघांचा मृत्यू-प्रशांत मोदी

भटक्या व बेवारस कुत्र्यांचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे निष्पाप दोघांना जीव गमवावा लागला. याला जबाबदार कोण त्यावर कारवाई व्हावी, तसेच याच्या मुळापर्यंत जावून चौकशी करावी, अशी मागणी प्रशांत मोदी यांनी केली आहे.

देवानंदवर गुरांना पाणी पाजताना झाला होता हल्ला

देवानंद लोंढे यांचे जकातवाडी आणि डबेवाडी या गावाच्या मध्येच शेतात जनावरांचे शेड आहे. त्या शेडात दि.23 डिसेंबरला तो दुपारी जनावरांना पाणी पाजत होता. तेव्हाच त्याच्यावर कुत्र्यांने हल्ला केला आणि जखमी केले. त्याने दोन इजेंक्शन घेतले होते. मंगळवारी त्याचे डोके दुखू लागल्याने उपचारासाठी नेले होते.

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा-चंद्रकांत सणस

आरोग्य विभाग व प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. सोनगाव कचरा डेपोत खायला भेटत असल्याने भटक्या कुत्र्यांचे कळप कळप दिसतात. त्या कुत्र्यांमधील ते पिसाळलेले कुत्रे नसावे. परंतु प्रशासनानडे याकडे लक्ष घालून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी जकातवाडीचे सरपंच चंद्रकांत सणस यांनी केलेली आहे.

परिहारांना घालणार घेराव भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून करण्यात यावा अन्यथा पशुसंवर्धन उपायुक्त परिहार यांना घेराव घालणार अशी माहिती रिपब्लिकन ब्लू फोर्सचे किरण ओव्हाळ, तालुकाध्यक्ष दीपक गाडे, सघंटक भिकाजी सावंत यांनी दिली. नगरपालिकेने सुद्धा यामध्ये गंभीर दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, सदरबझार परिसरात सुद्धा एका मुलीस आठ-दहा कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या भटक्या कुत्र्यांवर कुठल्याही प्रकारच अंकुश ठेवला जात नाही. काही पशु प्रेमींनी व प्राणीमित्र संस्थेने यामध्ये आडवेतिडवे न येता या अशा भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास प्रशासनाला सहकार्य करावे, त्यामध्ये सातारा नगरपालिकेने सुद्धा येथे सोनगाव कचरा डेपो असल्याने त्या भागात बोकाळलेल्या कुत्र्यांवरती किंवा पिसाळलेल्या कुत्र्यानां लसीकरणाची मोहीम करून त्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे कार्यकर्ते पशुसंवर्धन उपायुक्त परिहार घेराव घालणार आहेत, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा युवक उपाध्यक्ष सोमनाथ धोत्रे यानी दिला.

Related Stories

सातारा जिल्ह्याची चिंता वाढली; १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

triratna

हातकणंगले नगरपंचायतीत खासदार मानेंनी घेतली आढावा बैठक

Shankar_P

सातारा : उपाध्यक्षसाहेब, तेवढं ह्यांच्याकडं ही बघा!

datta jadhav

कोल्हापूर : सायंकाळी सहा पर्यंत २७ रिपोर्ट पॉझिटिव्ह

triratna

कराड नगरपालिकेतर्फे विविध स्पर्धा

Patil_p

सातारा : जिल्हात रुग्णसंख्या तीन हजारावर

triratna
error: Content is protected !!