तरुण भारत

कोल्हापूर नाक्यावरील तो फलक म्हणजे ‘जखम मांडीला अन् मलम शेंडीला’

प्रतिनिधी/ कराड

कराडचे प्रवेशद्वार असलेला कोल्हापूर नाका मृत्यूचा सापळा बनला असतानाच उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अपघातप्रवण क्षेत्रात फलक लावण्यास मनाई असतानाही कोल्हापूर नाक्यावर रस्ते सुरक्षा अभियानाचा फलक झळकला आहे. हेल्मेट वापरण्याचा फलकावरील संदेश योग्य असला, तरी कोल्हापूर नाक्यावरील फलक म्हणजे ‘जखम मांडीला अन् मलम शेंडीला’ अशी अवस्था झाल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

सध्या कराड परिसरात रस्ता सुरक्षा अभियानाचे फलक झळकत आहेत. कोल्हापूर नाक्यावरही रस्ता सुरक्षा अभियानाचे फलक लावण्यात आला आहे. वास्तविक कोल्हापूर नाका अपघातप्रवण क्षेत्र असल्याने येथे खासगी वाहनांचा थांबा, डिजीटल फलक लावण्यास मनाई आहे. कोल्हापूर नाक्यावर सातत्याने जीवघेणे अपघात होत आहेत. महामार्गावरून भरधाव जाणारी वाहने, शहरातून बाहेर येणारी अवजड वाहने आणि शहरात जाणारी सर्व प्रकारची वाहने या त्रांगडय़ात कोल्हापूर नाक्यावर अपघात वारंवार होत असतात. या परिसरात ठोस उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. यातच आता रस्ता सुरक्षा अभियान सुरू झाले आहे. या अभियानाच्या माध्यमातून वाहनधारकांत जनजागृती सुरू आहे. जनजागृती करणे गरजेचे आहे. कोल्हापूर नाक्यावरही जनजागृतीचा फलक उड्डाणपुलाखाली लावला आहे. उड्डाणपुलाखाली लावलेला फलक अपघात प्रवण क्षेत्रात झळकत आहे. एका बाजूला कोल्हापूर नाक्यावर अपघात होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. दुसरीकडे हेल्मेट वापरा म्हणून संदेश देणारा फलक झळकत आहे. फलकाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर खासगी वाहने धोकादायक पद्धतीने प्रवासी घेण्यासाठी थांबत आहेत. याकडे प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.

Related Stories

अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा भाजपने केला निषेध

triratna

सातारा : दिवसभरात 80 बाधित, 14 मुक्त, दोघांचा मृत्यू

Shankar_P

मोती चौकातल्या पेव्हरचे काम पुन्हा सुरु

Patil_p

सातारा : ३४ बळी, ७०८ कोरोनाबाधित, ५०० मुक्त

triratna

जिल्हय़ाला ‘निसर्ग’चा तडाखा

Patil_p

भैरवनाथ डोंगरावरील अतिक्रमणावर वनविभागा कडून हातोडा

Patil_p
error: Content is protected !!