तरुण भारत

पालिकेच्या शाळा सॅनिटाझर करुनच मुलांना प्रवेश

प्ले ग्रुपसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार

प्रतिनिधी/ सातारा

इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग दि. 27 पासून सुरु होणार आहेत. त्या अनुषंगाने सातारा पालिकेचे ते वर्ग सॅनिटायझर करुनच मुलांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. मुलांना शिकवणाऱया शिक्षकांचीही कोरोना तपासणी करण्यात आली आहे. पालिका शाळेत दर्जेदार शिक्षण देण्याकरता प्ले ग्रुपसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही बैठकीत उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.

पालिकेच्या शाळा नंबर 1 मध्ये मुख्याद्यापकांची बैठक उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रशासन अधिकारी मारुती भांगे यांच्यासह पालिका शिक्षण मंडळाचे अधिकारी, मुख्याद्यापक उपस्थित होते. यावेळी मुख्याद्यापकांनी शाळांच्या बाबतीतल्या समस्या मांडल्या. शाळा सुरु होण्यापूर्वी कोरोनाच्या अनुषंगाने प्रत्येक मुल हे सातारा शहरातील आहे. त्यामुळे त्या सर्व मुलांची काळजी ही सातारकरांची काळजी आहे. शाळेत येणाऱया प्रत्येक मुलांचे टेम्परेचर तपासून घ्यावे, त्यांना मास्क असायला हवा. हातावर सॅनिटाझर असायला हवे. पालिकेकडून शाळांना टेम्परेचर गन आणि सॅनिटायझर देण्यात येईल, असे आश्वासन उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी देत पालिका शाळेत दर्जेदार शिक्षण कसे देता येईल यासाठी प्रत्येक शाळेची जबाबदारी आहे. त्याकरता घरोघरी भेटी देवून पालिका शाळेचे महत्व पटवून सांगितले पाहिजे. तसेच प्ले ग्रुप सुरु करायचा असल्यास मुख्याद्यापकांची तयारी असली पाहिजे. त्यांची तयारी असल्यास आम्हाला कटाकाक्षाने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे पाऊल उचलता येईल, असे त्यांनी आश्वासन दिले.

Related Stories

पचगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ

triratna

महाराष्ट्र : कोरोनाबाधित रुग्णांनी पार केला 14 लाखांचा टप्पा

pradnya p

सातारा : हॉटेल मालकासह हॉटेलमध्ये जेवणार्‍या सहा जणांवर गुन्हा

triratna

जतमध्ये बंधाऱ्यात बुडून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू

triratna

कर्नाटकातून विक्रीसाठी आणलेल्या सव्वापाच लाखाचा रेशनचा तांदूळ जप्त, चालकास अटक

triratna

बळीराजाच्या शेती कामाला वेग

triratna
error: Content is protected !!