तरुण भारत

20 कोटींहून अधिक नेटफ्लिक्सचे पेड सब्सक्राइबर

टाळेबंदीत केवळ भारतात 1.40 कोटी नवे ग्राहक

2020 या साली एकीकडे चित्रपटगृहांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले, तर दुसरीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठा लाभ झाला आहे. चित्रपट आणि मनोरंजन प्रेमींनी घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा मनसोक्त आनंद लुटला आहे. यातून सर्व प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांच्या संख्येत वृद्धी दिसून आली आहे. याचा सर्वाधिक लाभ नेटफ्लिक्सला झाला असून त्याने अलिकडेच 20 कोटींहून अधिक पेड सब्सक्राइबर (शुल्क भरून सेवा मिळविणारे) प्राप्त केले आहेत.

जगभरातील 190 देशांमध्ये विस्तार असलेल्या नेटफ्लिक्सने स्वतःचा चौथ्या तिमाहीतील अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार नेटफ्लिक्सच्या सशुल्क वापरकर्त्यांच्या संख्येत 85 लाखांची भर पडली आहे. 2018 पर्यंत नेटफ्लिक्सकडे केवळ 11 कोटी सशुल्क वापरकर्ते होते, ज्यात 23 टक्के वाढ दिसून आली आहे. हे नवे सशुल्क वापरकर्ते बहुतांशी अमेरिका आणि कॅनडाबाहेरील आहेत. युरोप आणि मध्यपूर्व आफ्रिकेत हे सशुल्क वापरकर्ते वाढले आहेत. तर दुसरीकडे आशिया-प्रशांत भाग नेटफ्लिक्सच्या वापरवृद्धीत दुसरा सर्वात मोठा भागीदार आहे.

नेटफ्लिक्सवरील सीरिजची भुरळ

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली सीरिज ‘द क्राउन’चा नवा सीझन प्रेक्षकांना भुरळ पाडत आहे. या नव्या सीझनमुळे जुन्या सीझनच्या ह्युअरशिपमध्येही वाढ झाली आहे. द क्राउनला आतापर्यंत 10 कोटी प्रेक्षक लाभले आहेत. तर दुसरीकडे ‘द क्वीन गॅम्बिट’ही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. या सीरिजला 6.2 कोटी प्रेक्षक लाभले आहेत. या सीरिजच्या प्रदर्शनानंतर चेस-बोर्डची विक्रीही वाढली आहे. याचबरोबर जर्मनीची स्थानिक सीरिज ‘बारबेरियन’ला 3.7 कोटी तर कोरियन हॉरर शो ‘स्वीट होम’ला 2.2 कोटी प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभला आहे.

भारतात लोकप्रियता वाढतेय

महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत प्रत्येकाने अधिकाधिक काळ घरातच घालविला आहे. याच कालावधीत लोकांनी ओटीटीचे सब्सक्रिप्शन घेतले आहे. डाटा आणि ग्राफचा प्लॅटफॉर्म ग्राफ ग्रामच्या अहवालानुसार 2020 मध्ये टाळेबंदी नेटफ्लिक्सला 1.40 कोटी नवे ग्राहक मिळाले आहेत. मागील वर्षी नेटफ्लिक्सच्या सशुल्क वापरकर्त्यांची संख्या वाढून 2.6 कोटी झाली आहे. चालू वर्षात हा आकडा 3.3 कोटी तर 2020 मध्ये 3.8 कोटी होणार असल्याचा अनुमान आहे. 2023 पर्यंत भारत हा अमेरिकेनंतर नेटफ्लिक्ससाठी सर्वात मोठी बाजारपेठ ठरू शकतो.

Related Stories

कंगना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; आता शेतकऱ्यांना म्हणाली…

pradnya p

अजूनीमध्ये परग्रहावरील माणसाची गोष्ट

Patil_p

ड्रग्ज प्रकरण : एनसीबीकडून अंधेरीत 4 ठिकाणी छापे

pradnya p

कंगनाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला

pradnya p

सामाजिक विषयावर अवधूत गुप्तेंचे पहिलेवहिले रॅप सॉंग

Patil_p

कोरोनामुळे लागला ब्रेक !

tarunbharat
error: Content is protected !!