तरुण भारत

एक दिवसाची मुख्यमंत्री होणार ‘सृष्टी’

राष्ट्रीय बालिका दिन – उत्तराखंडमध्ये विशेष उपक्रम

अनिल कपूर यांचा नायक हा चित्रपट सर्वांनीच पाहिला असावा. पत्रकाराची व्यक्तिरेखा साकारणारे अनिल कपूर टीव्ही मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचे पत्र साकारणाऱया अमरीश पुरी यांना झोंबणारे प्रश्न विचारतात, यावर ते एक दिवसाचा मुख्यमंत्री होऊन काम समजून घेण्याचे आव्हान अनिल कपूर यांना दिले जाते. आता दृश्य फिल्मी असले तरीही कथानक वेगळे आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंदसिंग रावत यांनी राष्ट्रीय बालिका दिनी हरिद्वार येथील विद्यार्थिनी सृष्टी गोस्वामी यांना 24 जानेवारी रोजी एक दिवसाचा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

एक दिवसाच्या कार्यकाळात सृष्टी राज्याच्या विकासकामांचा आढावा घेणार आहे. हरिद्वारच्या दौलतपूर गावाची रहिवासी सृष्टी बीएससी ऍग्रिकल्चरचे शिक्षण घेत आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विद्यार्थिनीला अशाप्रकारे एक दिवसाचे मुख्यमंत्री भूषवू देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Related Stories

लडाख : चिनी सैनिक 2 किमी मागे हटले

datta jadhav

दाऊद कराचीतच; पाकिस्तान सरकारची कबुली

datta jadhav

अभिनेता संजय दत्तला रुग्णालयातून डिस्चार्ज

pradnya p

महिला पोलीस अधिकाऱयाकडे दहशतवादविरोधी मोहिमांचे नेतृत्व

Patil_p

लाच घेणाऱ्या अधिकाऱयाला तत्काळ शिक्षा द्या : मनिष सिसोदिया

prashant_c

पेट्रोल-डिझेल दर वाढता वाढता वाढे

Patil_p
error: Content is protected !!