तरुण भारत

थँक गॉड : आधुनिक यमराज होणार अजय देवगण

ओएमजीच्या श्रीकृष्णप्रमाणे असणार व्यक्तिरेखा

अभिनेता अजय देवगण याचीच निर्मिती असलेल्या ‘थँक गॉड’ या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असून याचे दिग्दर्शन इंद्रकुमार करत आहेत. अजय या चित्रपटात यमराजाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. परंतु यात अजय रेडय़ावर स्वार होऊन हातात नागपाश धरून दर्शविण्यात येणार नाही. ‘ओह माय गॉड’मध्ये ज्याप्रकारे अक्षय कुमारने श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा साकारली होती, त्याचप्रकारे ‘थँक गॉड’मध्ये  यमराजाच्या पात्राला आधुनिक साज दिला जाणार आहे. चित्रपटात अजयला आजच्या काळातील यमराज म्हणून दाखविण्यात येणार आहे.

अजय देवगणचे आगामी चित्रपट

अजय देवगणचे यंदा मेडे, मैदान, भुज, प्राइड ऑफ इंडिया’ हे चित्रपट प्रदर्शित होऊ शकतात. दसरा किंवा दिवाळीपर्यंत अजय ‘चाणक्य’ चित्रपटाच्या चित्रिकरणाला प्रारंभ करणार आहे.

Related Stories

पार्कर टेक्निक शिकणार सलमान

Patil_p

बालिका वधू हा माझ्यासाठी जीवन बदलणारा अनुभव होता: अविका गोर

Patil_p

सोनाली कुलकर्णीचे भावासोबत ‘या’ क्षेत्रात पदार्पण

triratna

चार तासांच्या चौकशीनंतर NCB कडून कॉमेडियन भारती सिंहला अटक

pradnya p

मराठी अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम खाते हॅक

triratna

बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांनी केली आत्महत्या

pradnya p
error: Content is protected !!